
कोल्हापूर/ प्रतिनिधी: अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून मेंदूत शिरलेली बंदुकीची गोळी यशस्वीपणे काढली गेली.दिनांक २२ जानेवारी रोजी मनोज यशवंत प्रभू वय वर्षे ४२ मु. पो. मटाक, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथील शेतामध्ये राखणीसाठी गेले असता माकडांचा शेतामधील उपद्रव थांबवत होते. त्यासाठी बंदुकीचा वापर करत असताना अनावधानाने ट्रीगर दाबले गेले व गोळी डोक्याच्या मागच्या भागामध्ये लागली. ही गोळी मेंदूच्या मागील अत्यंत अवघड भागात म्हणजे ब्रेन स्टेम जवळ घुसली. असे पेशंट वाचवणे हे खूप अवघड काम असते. पण प्रसिद्ध मेंदू तज्ञ डॉ.संतोष प्रभू यांचे शस्त्रक्रिया कौशल्य व विन्स हॉस्पिटल येथील अत्याधुनिक तंत्रज्ञान यामुळे त्यांच्या मेंदूतून हे बंदुकीची गोळी यशस्वीपणे काढता आली व ही शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असूनही डॉ. प्रभू यांनी व्यवस्थित पार पाडली आहे. सध्या पेशंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असून तो पुर्णतः बरा आहे.डॉक्टरांचे कसोशीने प्रयत्न व अचूक शस्त्रक्रिया कौशल्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यामुळेच अशा प्रकारच्या अनेक अवघड शस्त्रक्रिया आजपर्यंत विन्स हॉस्पिटलमध्ये यशस्वीरीत्या करण्यात आल्या आहेत. परंतु बंदुकीची गोळी काढण्याची शस्त्रक्रिया डॉ.संतोष प्रभू यांनी तब्बल पंधरा वर्षानंतर पुन्हा एकदा केली आहे.आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी असे चार रुग्ण हाताळले आहेत.आणि ते रुग्ण जगले आहेत.गोळी लागून जगण्याचा दर फक्त 5 टक्के आहे.कोल्हापूर मध्ये मेंदूत गोळी लागणे आणि ती शस्त्रक्रिया यशस्वी होण्याच्या आतापर्यंतच्या सर्व शस्त्रक्रिया फक्त विन्स मध्येच होऊन रुग्ण पुर्णतः बरे झाले आहेत.कोल्हापूर मध्ये अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध आहे असे डॉ. संतोष प्रभू यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस डॉ. सुजाता प्रभू,डॉ.प्रशांत कोल्हापूरकर उपस्थित होते.
Leave a Reply