
कोल्हापूर : सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये सांगली जिल्ह्यातील अडीच वर्षीय मुलीवर यशस्वीरित्या नुकतेच यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. वयाच्या पहिल्याच वर्षी चयापचयाच्या दुर्मिळ यकृत आजाराने ग्रस्त असलेल्या मुलीने प्रतिकूल वैद्यकीय परिस्थितीवर मात केली. चयापचयाच्या दुर्मिळ यकृत आजार,यकृत निकामी होण्यासह मुत्रपिंड निकामी होण्याचा धोका तसेच यकृताचा कर्करोग होण्याची लक्षणे व प्रत्यारोपणानंतर नवीन यकृत स्विकारण्यास झालेला अडथळा अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत डॉक्टरांच्या टीमने यशस्वीरित्या यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली.डॉ.विभूते पुढे म्हणाले, या मुलीला घरी सोडल्यानंतरही नियमित रक्त तपासण्या व उपचारासाठी हॉस्पिटलकडून मदत मिळत आहे व ती आम्ही सुरूच ठेवू.सह्याद्रि हॉस्पिटल्सचे युनिट प्रमुख डॉ.केतन आपटे म्हणाले, गुंतागुंतीच्या वैद्यकीय परिस्थितीमध्ये बहुआयामी प्रयत्न आणि अद्ययावत उपचार सुविधेने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या.या मुलीच्या उपचारासाठी प्रविण अगरवाल फाऊंडेशन संस्थेचे संस्थापक प्रविण अगरवाल आणि आणि ट्रान्सप्लांट हेल्प द पुअर फाऊंडेशन ने मोलाचे सहकार्य केले.
Leave a Reply