
कोल्हापूर : डॉ. डीवाय पाटील हॉस्पिटल व स्पाईन फाउंडेशन यांच्यामध्ये आधुनिक पद्धतीच्या मणक्याच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी करार झाला आहे.या करारांअतर्गत आर्थिक परिस्थिती नसलेल्या रुग्णांच्या मणक्याच्या किंवा एखाद्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत.या उपक्रमाचे उदघाटन आज डॉ. डी. वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये स्पाईन फाऊंडेशनचे डॉक्टर शेखर भोजराज आणि डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती संजय डी.पाटील यांच्या सह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.आजपासून सुरू झालेले हे शिबीर आठवड्यातून एक दिवस दर बुधवारी सुरू राहणार आहे व दोन माहिन्यातून एकदा रुग्णांचे ऑपरेशन मोफत केले जाणार आहे.आज पहिल्याच उपक्रमात 150 लोकांनी नोंदणी केली आहे. आज झालेल्या पहिल्याच शिबिरात दोन रुग्णांच्या मणक्याच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.आज शिबिरात डॉ.शेखर भोजराज यांनी गरीब व गरजू रुग्णासाठी हा उपक्रम राबविला जात असल्याचे सांगितले.या कराराअंतर्गत आर्थिक परिस्थिती नसलेल्या पेशंटची मोफत तपासणी व ऑपरेशन (शस्त्रक्रिया) केल्या जाणार असल्याचे सांगितले.यावेळी अस्थीरोग विभाग प्रमुख डॉ. सलीम लाड यांनी कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितली.डॉ. डी.वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.शिंपा शर्मा यांनी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.यावेळी विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. व्ही.व्ही भोसले,वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, डायरेक्टर डीवायपी ग्रुप डॉ. ए.के.गुप्ता, डेप्युटी रजिस्ट्रार, संजय जाधव,डॉ. प्रदीप पाटील,डॉ. अभय शिर्के,डॉ. क्षमा कुलहळी डॉ. सुचित्राराणी राठोड,डॉ. जावेद सागर आदी उपस्थित होते.डॉ. सचिन फिरके यांनी सुत्रसंचालन व आभार मानले.स्पाईन फॉऊंडेशन व डॉ. डी.वाय.पाटील हॉस्पिटलमधील टीमने शीबिरासाठी सहकार्य केले.
Leave a Reply