
कोल्हापूर : जागतिक आरोग्य संघ आणि केंद्र सरकारने व्यापक आरोग्य प्रबोधनासाठी घोषित केलेले १२२ आरोग्य दिन तसेच जिल्हयासह पश्चिम महाराष्ट्रातील विविध सेवा भावी एनजीओ संस्थासह ब्लड बँका ,रुग्णवाहीका, आपत्तकालीन मदतीसाठी तत्पर कार्यकर्तै – प्राणीमित्र आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील दवाखान्यांची फोन नंबरसह यादी असणारी आरोग्य दिनदर्शिका २०२० ही सर्व सामाजिक कार्यकत्यांसह सर्वांना संदर्भ संपर्क मूल्यासह महत्वाची आहे , त्यांची जिल्हानिहाय व्याप्ती भविष्यात वाढवावी ” अशा शब्दात आपल्या शुभेच्छा देत आ . चंद्रकांत जाधव यांनी शायरन फिचर्सच्या या आरोग्य दिनदर्शिकेचे प्रकाशन केले . पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रौप्य महोत्सवी शाह मॅरेथॉन स्पर्धेच्या बक्षिस समारंभावेळी हे प्रकाशन संपन्न झाले .आरोग्यदिनदर्शिकेच्या संपादीका सीमा राजेंद्र मकोटे यांनी आगामी काळात डाँक्टरासह जाणकारानी केलेल्या सुचना व मार्गदर्शनानुसार यांची व्यापकता वाढविणार आसल्याचे सांगितले.यावेळी डॉ . विलास संघवी , शाह मरेथॉनचे किसन भोसले , चंद्रकांत झुरळे , देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव , महाभारतचे जयेश कदम , ऊदय घोरपडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.सदर दिनदर्शिका सावली सह विविध सामाजिक संस्थात ऊपलब्ध आहे.या आरोग्य क्षेत्रातील एकत्रित माहिती ऊपक्रमासाठी वेदीया ग्राफीक्स , होमिओपँथी मेडीकल काँलेजट्रेड विन्स , अविष्कार क्रियेशन , धन्वंतरी पंतसंस्था ,दीप फौडेशन , जीवनधारा , श्रुतिका , कोल्हापूर केमिस्ट असोशिएशन आदीचा सहभाग व सहकार्य लाभाले आहे.
Leave a Reply