कोल्हापूरकरीता डिफेन्स हब व्हावा: खा.संजय मंडलिक यांची मागणी

 

कोल्हापूर : देशातील संरक्षण अन् हवाई उत्पादन क्षेत्रातील संशोधन व उत्पादनामधील परदेशी अवलंबित्व कमी होऊन देशातील संशोधनाला चालना मिळावी म्हणून राज्य शासनाने डिफेन्स हबची घोषणा करुन यामध्ये पुणे, नागपूर, अहमदनगर,नाशिक व औंरगाबाद या जिल्ह्यांचा समावेश केला आहे, या डिफेंन्स हबमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचाही समावेश व्हावा अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचेकडे नुकतीच समक्ष भेटून केली आहे.दरम्यान यासंदर्भात अधिक माहिती देताना खासदार मंडलिक म्हणाले, देशाच्या संरक्षण क्षेत्राची सुमारे 70% इतकी गरज ही आयातीद्वारे भागववली जाते. केंद्र शासन संरक्षण क्षेत्रासाठी करावी लागणारी आयात घटविण्यासाठी प्रयत्नशील आहे. डिफेंन्स हबकरीता आवश्यक असणाऱ्या बाबी कोल्हापूर जिल्हा पुर्ण करीत असून डिफेन्स हबमध्ये इतर पाच जिल्ह्यांसह कोल्हापूरचा समावेश झाल्यास सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाचे सार्वजनिक उद्योग, स्टार्टअप, वैयक्तिक इनोव्हेट्स, संशोधन अन् विकास संस्थांसाठी मोठे व्यासपीठ मिळणार आहे. तसेच, याठिकाणी नव्याने उद्योग येऊन या भागाच्या विकासाला चालना मिळणार असून देशी संशोधक व उद्योजकांना जास्तीत जास्त प्रोत्साहन दिले जाणार असल्याने हा हब कोल्हापूरकरीता महत्वाचा असल्याचेही खासदार मंडलिक यांनी यावेळी नमुद केले.यापार्श्वभुमीवर, या योजनेमध्ये शासनाने सदर उद्योगांसाठी सवलती व प्रोत्साहन जाहीर केले असल्याने मोठे उद्योजक व स्थानिक गुंतवणूकदार कोल्हापूर जिल्ह्यात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित होणार असल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यासंदर्भात सकारात्मकता दर्शविली असून लवकरच बैठक आयोजीत करत असल्याचेही त्यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!