
कोल्हापूर : हाडांसाठी भारतातील सुप्रसिद्ध असलेल्या संचेती इन्स्टिट्युट फॉर आर्थोपेडिक्स अँड रिहॅबिलीटेशन आणि श्री लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्ट,कोल्हापूर यांच्या तर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार,9 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत श्री लक्ष्मीनारायण मंदिर,व्हिनस कॉर्नर,शाहुपूरी,कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे.या शिबिरात ऑर्थोपेडीक्स तपासणी,ऑर्थोपेडीक्स कन्सलटेशन,बीएमडी मशीन टेस्ट आणि सल्ला,फिजिओथेरपी या सेवा सुविधांचा विनामूल्य लाभ घेता येणार आहे.तसेच सांधेदुखी,संधिवात,सांधे प्रत्यारोपण,कंबर दुखणे,हाता-पायांना मुंग्या येणे,फ्रोजन शोल्डर,मणक्याचे जुने आजार,डायबेटिक न्युरोपॅथी,सायटिका पेन ,लिगामेंट इंज्युरी,टेनिस एल्बो या सर्व आजारांवर मार्गदर्शन मिळेल.हे शिबिर मोफत असून याकरिता नोंदणी अनिवार्य आहे.येताना जुने केस पेपर्स व एक्स रे घेऊन यावेत.
Leave a Reply