
कोल्हापूर: वाढीव वीज दरामुळे उद्योग धंदे अडचणीत आहे. ही वाढीव वीज सवलतीच्या दरात मिळावी अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज राज्याचे वीज मंत्री नितिन राऊत यांच्याकडे केली.सध्या महाराष्ट्रामध्ये उद्योग-धंद्याना अत्यंत अडचणीत असून काळातून जावे लागत आहे .राज्यातील जवळपास सर्व उद्योगधंदे अडचणीत आलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरमध्ये एका उद्योजकाने कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे, उद्योगजकांनी शासनस्तरावर वाढीव वीज दराबाबत माहिती दिलेली आहे. याची दखल घेत आमदार चंद्रकांत जाधव यांनी वीज दरवाढ कमी करण्यासाठी ऊर्जा मंत्री श्री. नितिन राऊत यांच्याकडे आग्रही मागणी केली.यावेळी आमदार जाधव यांनी आत्ता अस्तित्वात असलेल्या वीज दरामुळे उद्योग पूर्णपणे अडचणीत आहे. सर्वत्र मंदीचे पूर्ण वातावरण आहे. महावितरण कंपनीने फार मोठ्या प्रमाणात वीज दरवाढ प्रस्तावित केली आहे सदर वीजदरवाढ अमान्य आहे. ही वीज दरवाढ झाली तर राज्यातला उद्योग कोलमडून पडेल असे ठाम मत व्यक्त केले.वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगडे यांनी वीज दरवाढीचे तांत्रिक मुद्यांची माहिती देऊन होणारी वीज दरवाढ कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवल्या.
याबाबत मंत्री राऊत यांनी याची दखल घेत तातडीची बैठक घेऊन वाढीव वीज दराचा तपशील घेतला. यावेळी मंत्री राऊत यांनी वाढीव वीज दराबाबत शासनाची भूमिका स्पष्ट केली व उद्योजकांना वीज दरात सवलत देण्याविषयी शासन सकारात्मक आहे, असे नमूद केले. ऊर्जा सचिव असिमकुमार गुप्ता यांनी वीज दराबाबत शासनाची भूमिका स्पष्ट करत आमदार चंद्रकांत जाधव व पदाधिकारी यांची उपाययोजनांची माहिती घेऊन वीज दरवाढ कमी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी नामदार सतेज पाटील यांचे प्रतिनिधी प्रशांत पाटील, खासदार मंडलिक यांचे प्रतिनिधी विज्ञानंद मुंडे, भरत अग्रवाल, चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे व उद्योजक सुरेश चैहान, अमित हुक्केरीकर, उदय जाधव उपस्थित होते.
Leave a Reply