
कोल्हापूर : “उद्योग व्यवसायाची मशिन्स आणि व्यवस्था अधिक गतीमान, चोख आणि प्रभावी बनविण्यासाठी इंडस्ट्री 4.0 ही काळाची गरज बनली आहे त्यामुळे त्यासाठी पुरक वातावरण तयार करणे व त्याची अंमलबजावणी करणे महत्वाचे आहे” असे मत किर्लोस्कर ऑईल इंजिन्सचे वरिष्ठ व्यवस्थापक रमेश चव्हाण यांनी व्यक्त केले. कोल्हापूर इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीचे अभियंत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर येथे इंडस्ट्री 4.0 प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळयात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी केआयटीचे अध्यक्ष भरत पाटील होते. चव्हाण पुढे म्हणाले, उद्योग क्षेत्राची वाढती व वैविध्यपूर्ण मागणी पूर्ण करावयाची असल्यास उत्पादकांना त्यांची व्यवस्था अधिका-धिक तंत्रज्ञान केंद्रीत बनवावी लागेल. त्यांच्या मनोगतात यावेळी त्यांनी इंडस्ट्री 4.0 ची अंमलबजावणी किर्लोस्कर ऑईल इंजिन्समध्ये कशी सुरु आहे याची माहिती देऊन प्रगती विशद केली.यावेळी उपस्थित ग्रेसफुल ग्रोथ कंपनीचे संचालक बसवराज हूली यांनी त्यांच्या मनोगतात आजच्या उद्योग क्षेत्राचा कल मनुष्य भावनांपेक्षा डेटा केंद्रीत कसा आहे हे स्पष्ट केले तर यावेळी उपस्थित इंडस्ट्री 4.0 विषयाचे तज्ञ सल्लागार सतीश ईवटुरी यांनी सी फोर आय फोर या प्रयोगशाळेत कंपनीच्या मुल्यमापनासाठी बनविलेले विविध मोडयुल सांगितले. व कोणत्याही कंपनीत इंडस्ट्री 4.0 अवलंबवयाचे असल्यास त्यासाठी आवश्यक 50 मुद्दे व तंत्रज्ञान स्पष्ट केले. सीआयआय दक्षिण महाराष्ट्र विभागाच्या उपाध्यक्षा पल्लवी कोरगांवकर यांनी मनोगत व्यक्त करुन केआयटीच्या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. यावेळी या प्रकल्पाचे मुख्य प्रायोजक आयएफएम इलेक्ट्रॉनिक्स लॅबचे संचालक श्री. बिपीन जिरगे यांनी मनोगत व्यक्त करुन इंडस्ट्री 4.0 या विषयावर सादरीकरण केले. एकूणच विविध वक्त्यांच्या मनोगतातून आणि सादरीकरणातून इंडस्ट्री 4.0 या विषयावर सखोल मार्गदर्शन झाले.यावेळी केआयटीचे सचिव दिपक चौगुले, विश्वस्त सचिन मेनन उपस्थित होते. केआयटीचे संचालक डॉ. व्ही.व्ही.कार्जिन्नी यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. उदय भापकर यांनी आभार प्रदर्शन केले. प्रा. प्रमोद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तर शैलेश शहा, संदेश सांगले, भूषण कांबळे, सयाजी पाटील, अमर रेणके, चैतन्य पेडनेकर, निलेश देसाई आणि आशिष पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
Leave a Reply