
कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल रेस कोर्स नाका,येथे कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आयोजित केलेल्या कै. अशोक कुलकर्णी स्मृति खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात प्रारंभ झाल्या.या स्पर्धेचे उद्घाटन निपाणीचे बुद्धिबळ प्रेमी उद्योगपती प्रवीण शहा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले यावेळी व्यासपीठावर उद्योगपती एम जी जोशी, आनंद कुलकर्णी,आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले,भारत पाटोळे,मनिष मारुलकर,सागर गुळवणी,उत्कर्ष लोमटे व दीपक वायचळ,निहाल मुल्ला इ. उपस्थित होते. अनुराधा गुळवणीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.पुणे सातारा सिंधुदुर्ग सांगली बेळगाव निपाणी व स्थानिक इचलकरंजी जयसिंगपूर व कोल्हापूर येथील नामवंत 122 बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत यापैकी 49 बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण नऊ फेऱ्यात होणार आहेत. स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीनंतर अग्रमानांकित सौरभ छत्रे द्वितीय मानांकित अनिश गांधी तृतीय मानांकित रविंद्र निकम चौथा मानांकित रोहन जोशी,संतोष कांबळे,श्रीराज भोसले,निहाल मुल्ला,अभिषेक पाटील श्रीधर तावडे,योगेश महामुनी,प्रशांत अनवेकर,प्रणव पाटील,आदित्य आळतेकर यांच्यासह एकूण 29 जण दोन गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.
Leave a Reply