
कोल्हापूर: लमाण समाजाच्या वतीने संत सेवालाल महाराज जयंती निमित्त समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचा शुभारंभ कोल्हापूरच्या महापौर निलोफर अजगेकर, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक (नाना), आमदार चंद्रकांत जाधव, गुलाबराव घोरपडे, बबनराव रानगे, महेश मचले, यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आला यावेळी स्वागत व प्रास्ताविक लमाण समाज्याचे अध्यक्ष रामचंद्र पोवार यांनी केले,
यावेळी बोलताना वसंतराव मुळीक म्हणाले लमाण समाज हा दिवस रात्र काबाड कष्ट करणारा समाज आहे दिवसभर रस्त्यावर काम करणे व रात्री पाड्यावर येऊन झोपणे या व्यतिरिक्त या समाजाला काही माहीत नाही.लमाण समाजाच्या पिढ्यानपिढ्या काम करण्यातच गेल्या आज खऱ्या अर्थाने या समाजाला मुख्य प्रवाहात घेन्याची गरज आहे त्याच बरोबर या समाजाने ही आता शिक्षणाची कास धरण्याची गरज आहे शिक्षणामुळे एक घर सुधारत नाहि तर संपूर्ण समाज सुधारतो असेही त्यांनी सांगिले. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव यांनी लमाण समाजाच्या सर्व मागण्याचा पाठपुरावा करण्याचे अधीवचन दिले.यावेळी संतोष राठोड, विमल राठोड, किसन राठोड, प्रकाश चव्हाण, शिवराम राठोड, रामू चव्हाण, रमेश पोवार यांच्या बरोबर लमाण समाजातील नागरिक, कार्यकर्ते, पादाधीकारी, व महिला आपल्या पारंपारिक वेषभूषेत उपस्थित होत्या.
Leave a Reply