दिल्लीमध्ये शिवजयंती राष्ट्रोत्सव : संभाजी राजे छत्रपती यांची माहिती

 

कोल्हापूर: देशाची राजधानी दिल्ली येथे गेल्या दोन वर्षापासुन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय भव्य प्रमाणात साजरी करण्यात येते. पहिल्या वर्षी महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद, नौदल प्रमुख सुनील लांबा व लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत हे व दुसऱ्या वर्षी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन या प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होत्या.या ही वर्षी शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती खासदार युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत दिली.यामध्ये शाहिरी कार्यक्रम, रनवाद्य वादन, लेझीम पथक, शिवकालीन युद्धकला, तुतारी वादन आदींच्या गजरा मध्ये शिवजन्मकाळ साजरा होणार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार व विचार जगभर पसरावेत व सर्व  देशांनी त्यांचे आचरण करावे यासाठी विविध देशांच्या राजदूतांना आमंत्रित केले असून ते शिवछत्रपतींना अभिवादन करणार आहेत.दिल्लीत साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती सोहळ्याच्या माध्यमातुन महIराजांचा गौरवशाली इतिहास संपुर्ण जगभरात पोहचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव हा केवळ महाराष्ट्रापुरता किंवा मराठी लोकांपुरता मर्यादित न ठेवता तो संपूर्ण राष्ट्राचा उत्सव झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारताचे प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांचं स्वराज्य हे जनतेचं सुराज्य होतं. खऱ्या अर्थाने संपूर्ण देशवासीयांच्या मनावर आजही शिवरायांचं अधिराज्य कायम आहे. चांगल्या पिढ्या घडवायच्या असतील तर आपल्याला शिवरायांचा इतिहास संपूर्ण देशाच्या नवीन पिढीला शिकवावा लागेल.यासाठीच आम्ही शिवजयंती दिल्ली मध्ये करतोय. दिल्लीच्या शिवजयंती उत्सवाला ‘राष्ट्रोत्सव’ म्हणून आम्ही साजरी करतोय.ज्या महाराष्ट्राच्या मातीत शिवराय घडले त्या मातीत रुजलेल्या संस्कृतीचे दर्शन दिल्लीकरांना घडवत आहोत. दिल्ली मध्ये संपूर्ण देशातील लोक राहतात. त्यांनी पाहिलं पाहिजे की महाराष्ट्र हे राज्य सांस्कृतिक दृष्ट्या फार श्रीमंत आहे. पोवाडे, ध्वज पथक, ढोल ताशा पथक, हलगी पथक, लेझीम पथक अश्या अनेक पारंपरिक वाद्यांनी दिल्ली बहरून जाणार आहे. त्याचबरोबर शिवकालीन युद्धकला , मर्दानी खेळ यांचेही सादरीकरण होणार आहे.असेही संभाजी राजे छत्रपती यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!