
कोल्हापूर : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात शाहीन बाग परिसरात 15 डिसेंबर 2019 पासून धर्मांधांचे धरणे आंदोलन चालू आहे. या आंदोलनाचे नियोजन करणारा ‘जे.एन्.यू.’चा माजी विद्यार्थी शरजील इमाम याने उघडपणे ‘आसामला भारतापासून तोडण्यासाठी साहाय्य करणे आपले कर्तव्य आहे; असे घडेल तेव्हा केंद्र सरकार आपले ऐकेल. रेल्वेगाड्या बंद पाडा’, असे विधान केले. ‘अशी आंदोलने देशात सर्वत्र करा’, असे आवाहन या ठिकाणाहून सातत्याने केले जात आहे; याचाच अर्थ ‘असे हिंसक आंदोलन करून असे अराजक देशभर निर्माण करा आणि देश अस्थिर करा’ असा स्पष्टच आहे. यावरून या आंदोलनामागे सुनियोजित पद्धत वापरली जात असल्याचे लक्षात येते. एकंदरच आता या आंदोलनाने जे रूप धारण केले आहे, ते पाहता ‘विदेशी शक्तींची फूस असणारे साम्यवादी अन् धर्मांध यांनी एकत्र येऊन चालू केलेले हे हिंदूबहुल भारताच्या विरोधातील आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे’, या संशयाला बळकटी मिळत आहे. तरी पोलिसांनी येथील सर्व आंदोलकांना हुसकावून लावून हा परिसर रिकामा करावा आणि नागरिकांना सामान्य जीवन जगण्यासाठी अनुकूल वातावरण बनवावे, तसेच या आंदोलनात देशविरोधी, समाजविघातक आणि प्रक्षोभक वक्तव्ये करणार्या नेते, वक्ते आदींच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक किरण दुसे यांनी केली.नागरिकत्व सुधारणा कायद्या’च्या विरोधात हिंसाचार केल्याच्या प्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांनी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी संघटनेच्या १०८ कार्यकर्त्यांना अटक केली. या संघटनेच्या अन्य ५ जणांना बिजनौर येथून ५ जणांना अटक करण्यात आली असून हे सदस्य शाहीनबाग आंदोलन चिघळवण्यासाठी, आंदोलकांना प्रक्षुब्ध करण्यासाठी, तसेच आंदोलनासाठी आर्थिक साहाय्याची जुळवाजुळव करण्यासाठी सक्रीय झाले होते. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने देशात बंदी घालण्यात आलेली आतंकवादी संघटना ‘सिमी’च्या आतंकवाद्यांनी पी.एफ.आय.च्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिल्याचे काही घटनांतून समोर आले आहे. तरी देशात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर बंदी घालावी, अशी मागणीही करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात अपर चिटणीस संतोष कणसे यांना निवेदन देण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शिवसेना शहरप्रमुख रवीकिरण इंगवले, विलास वायफळ, करवीरतालुकाप्रमुख राजू यादव, संजय गांधी निराधशार योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे, उदय पोतदार, नितेश कुलकर्णी, शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळ अध्यक्ष कपील केसरकर, हिंदु महासभेचे संजय कुलकर्णी, दीपाली खाडे, नरेंद्र मोदी विचारमंच आणि मिशन न्यू कोल्हापूरचे सुनील सामंत, युवासेना करवीरतालुकाप्रमुख संतोष चौगुले, धर्मप्रेमी विनायक पाटोळे, प्रसन्न वरखेडकर, राजस्थानी बाराबलुतेदार समाजाचे प्रतिनिधी मोहब्बतसिंह देवल, अधिवक्ता प्रकाश खोंद्रे, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, मधुकर नाझरे, रामभाऊ मेथे उपस्थित होते.
Leave a Reply