
कोल्हापूर : जुन्या पिढीतील शिस्तप्रिय शिक्षक आणि नगरपालिकेच्या दत्ताजीराव शेळके विद्या मंदिर मधून अनेक पिढ्या घडवलेले श्री .नामदेव दत्तात्रय कदम ( वय ९६) यांचे वार्धक्याने रहत्या घरी निधन झाले. शिस्तप्रिय कदम गुरुजी म्हणून ते परिचित होते .सन 1945 ते 70 दरम्यान गोरगरिबांच्या मुलांना नगरपालिकेच्या शाळेतून दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी त्यांचे मोठे योगदान होते शहरातील सुप्रसिद्ध नवयुग लेदर चे ते संस्थापक होते . स्वातंत्रसैनिक म्हणून भरीव योगदान असूनही , त्यांनी त्यांचा कोणताही लाभ घेण्याचे जाहीरपणे नाकारले होते . “आम्ही कोल्हापुरी ” या प्रसिद्ध प्रा.अमन मोमीनच्या प्रचंड गाजलेल्या ऑडिओ कॅसेट मध्ये त्यांच्या या प्रसिद्धी पासून दूर असलेल्या कार्याची नोंद घेण्यात आली होती. त्यांच्यामागे दोन मुलगे , पाच मुली ,जावई ,सुना,नातवंडे असा परिवार आहे रक्षाविसर्जैन , गुरुवारी दि. 20 रोजी सकाळी नऊ वाजता पंचगंगा स्मशानभुमीत होणार आहे. संकल्प चे प्रसिद्ध मानस ऊपचारतज्ञ डॉक्टर पी.एन. कदम आणि नवयुग चे विघमान चालक राजेंद्र यांचे ते वडील होत.
Leave a Reply