जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन च्या वतीने वैद्यकीय परिषदेचे आयोजन

 

कोल्हापूर: कोल्हापूर,सांगली परिसरातील ॲलोपॅथी,होमीपॅथी तसेच आयुर्वेदिक या तिन्ही वैद्यकीय शाखेतील डाॅक्टरांसाठी जनरल प्राक्टीशनर्स असोसिएशन, कोल्हापूरच्या वतीने ११ व्या वैद्यकीय परिषदेेेचे आयोजन करण्यात आले आहे.येत्या रविवार दि .२३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी हॉटेल सयाजी येथे हि परिषद संपन्न होणार असल्याची माहिती असो.च्या प्रेसिडेंट डॉ.शुभांगी पार्टे,सेक्रेटरी डॉ. विनायक शिंदे,परिषदेचे चेअरमन डॉ.महादेव जोगदंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वैद्यकीय परिषदेसाठी कोल्हापूर व आसपासचे सुमारे ४०० डॉक्टर्स हजर राहणार आहेत . या परिषदेचे वैशिष्टय म्हणजे यावेळी तिन्ही पॅथीचे ( Alopathy , Homeopathy व Aurvedic ) यांची व्याख्याने असणार आहेत . त्यामुळे आमच्या असोसिएशन मध्ये असणारे सर्व पॅथीचे डॉक्टर्सना याचा फायदा होणार आहे.या परिषदेत होमिओपॅथीमधून सुप्रसिध्द होमिओपॅथीक कन्सलटंट डॉ.मोहन गुणे यांचे विविध आजारावर,ॲलोपॅथी मधून डॉ.प्राची जाधव यांचे थॉयराईड या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.तर डॉ.सतिश उदेग हे आयुर्वेदिक रसायनशास्त्र चिकित्सा पध्दती तसेच गुगल कल्फ या द्रव्याचा आयुर्वेदीक ग्रॅक्टीसमध्ये कसा फायदा होतो याचे मार्गदर्शन करणार आहेत. शिवाय जनरल पॅक्टीशनर्सना महत्वाचा असणा-या सी.टी.स्कॅन व एम.आय.आर.चा फायदा आणि अचूक निदान यासंदर्भात स्लाईड-शो द्वारे डॉ.मंजित कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत. तर आज समाजात जास्त भेडसावणाऱ्या ब्लडप्रेशर,हार्ट अटॅक व इतर हृदयाचे आजार यावर आयुर्वेदिक उपचार ऑपरेशनशिवाय कसे केले जातात.यावर माधवबागचे डॉ.रोहित साने हे मार्गदर्शन करणार आहेत.या परिषदेसाठी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दरम्यान असोसिएशनतर्फे यावर्षी असो.चे लाईफ मेंबर व माजी अध्यक्ष डॉ.राजेश कुंभोजकर यांना जीपीकाॅन पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचेही डॉ.जोगदंड यांनी सांगितले.यावेळी सेक्रेटरी डॉ.उषा निंबाळकर,खजानीस डॉ.विरेंद्र कानडीकर,डॉ.वर्षा पाटील,डॉ.शिवराज जितकर, डॉ.राजेश सातपुते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!