
कोल्हापूर : कलाब्धि देशभरातील कलांचे आणि कलाकारांचे व्यासपीठ बनावे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी व्यक्त केले.पोलीस गार्डन येथे विनस्पायर आयोजित व कलाब्धि राष्ट्रीय कला महोत्सव 2020 च्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी घाटगे पाटील उद्योग समूहाच्या मेघा पाटील, रोटरीचे सुरेंद्र जैन, घाटगे उद्योग समुहाच्या नवोदिता घाटगे, वेदांतिका माने, जिया झंवर, व्हस्टाईल ग्रुपच्या बिना जनवाडकर,यतीन जनवाडकर उपस्थित होत्या.पोलीस अधीक्षक श्री्र्री् देशमुख म्हणाले, कोल्हापूरची संस्कृती आणि कला परंपरा फार मोठी आहे. त्याला आजच्या काळात व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे आणि हे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विन्स्पायर फौऊंडेशन आणि कलाब्धि टीमला कोल्हापूर पोलीसांचे पूर्ण सहकार्य राहील.
देशभरातून शेकडो कलाकार या महोत्सवासाठी आले आहेत. कारागिरी, वस्त्र कलाकुसर, दागिने, खाद्यजत्रा अशा वेगवेगळ्या गोष्टीचे स्टॉल लागले आहेत. दोन दिवस कार्यशाळा, विविध स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम अशा भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी कोल्हापूरकरांसाठी आयोजित केलेली आहे. तरी या महोत्सवाला आणि प्रदर्शनाला कोल्हापूकरांनी भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. संयोजन अमृता यतीन जनवाडकर, डॉ. प्रियदर्शनी वरूण जैन, मानवी गौरव कामत, आर्कि़टेक्ट रीमा अमित करंजगार, ग्रीष्मा जय गांधी, देविणा तुषार घाटगे या करत आहेत.
या उपक्रमाचे क्युरेटर म्हणून प्राचार्य अजेय दळवी काम पहात आहेत. त्यांना आर्किटेक्ट अमर भोसले, देवीणा तुषार घाटगे, नवोदिता समरजीत घाटगे, वेदांतिका धैर्यशील माने, रिचा विशाल कपाडिया, दिशा आशिष पिलाणी, जिया नीरज झंवर, प्रमोद पाटील, विजय टिपुगडे, सौरभ रेडेकर, यश प्रभू, अभिषेक पाटील ,ऋषिकेश पाटीलआदी सहकार्य करत आहेत.
Leave a Reply