
सोलापूर :अत्यंत बिकट परिस्थितिवर मात करीत मुलाला कलेक्टर बनविणाऱ्या सावंत्रव्वा कलशेट्टी यांच्या ९व्या पुण्य स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव कोल्हापुर महानगर पालिकेचे आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाख़ाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श माता,आदर्श,शेतकरी,आदर्श सामाजिकसेवा आणि जीवनगौरव पुरस्कार देऊन मान्यवरांचा गौरव करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधिक्षक मनोज पाटील हे होते.या आदर्श पुरस्कार वितरणा प्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक मनोज पाटील, सोलापूर महानगर पालिका आयुक्त दिपक तावरे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्या हस्ते ह्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या पुरस्कारामुळे सामाजिक कार्य करणाऱ्याना निश्चितच प्रेरणा मिळणार असल्याचं सांगितलं.तर जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी आदर्श मातृत्वातूनच आदर्श समाज घड़तो असं सांगितलं.तर डॉ मल्लीनाथ कलशेट्टी यांनी उपस्थितांचे आभार मानताना या पुरस्काराच्या माध्यमातुन आपल्यावर जो सामाजिक ऋण आहे त्याची परत फेड करण्याची संधी मिळाल्याचं सांगितलं.
सदर कार्यक्रमात सौ सुगलाबाई म्हेत्रे आणि सौ गंगाबाई गायकवाड़ यांना आदर्श माता तर श्रीमती प्रतिभा दुधगी यांना आदर्श समाजसेवा,संजय चिंचोळी या शेतकऱ्याला आदर्श शेतकरी तथा शिवलिंग कोडले यांना जीवनगौरव तर ज़मीर अत्तार यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार देउन गौरविन्यात आलं.या कार्यक्रमाप्रसंगी वळसंगच्या सरपंच सौ महानंदा दुधगी, जिल्हापरिषद सदस्य ऍड संजय गायकवाड़,माजी पंचायत समिति सदस्या सौ सोनुताई कलशेट्टी,सुरेश माशाळे,जगदीश अंटद,सिद्धाराम कोडले,श्रीशैल दुधगी,सिद्धारूढ़ काळे,महादेव होटकर, दिनकर नारायणकर,
पार्श्वनाथ खोबरे यांच्यासह वळसंग तथा परिसरातील अबालवृद्ध महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
Leave a Reply