
कोल्हापूर : कोल्हापूर शहर 31 मार्च 2020 पर्यंत प्लॅस्टीक मुक्त करणेबाबत आराखडा आज आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांना सादर केला. सदरचा अहवाल आयुक्तांनी मंत्रालय, मुंबई येथे सादर केला. यावेळी पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल टिकिकर, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई रविंद्रम उपस्थित होते. यावेळी ना.आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूर शहर 31 मार्चपर्यंत प्लॅस्टीक मुक्त होणार असल्याने समाधान व्यक्त केले. यासाठी शहरवासीयांनी महानगरपालिकेस सहकार्य करावे त्यामुळे आपले शहर नेहमीप्रमाणे महाराष्ट्रात आघाडीवर रहावे असे आवाहन केले.या आराखडयामध्ये 31 मार्च पर्यंतच्या नियमित दैनंदिन कार्यवाहीचा आराखडा सादर करण्यात आलेला आहे.
Leave a Reply