अथायु हॉस्पिटलमध्ये हृदयाची झडपेवर चिरफाड न करत अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया यशस्वी

 

कोल्हापूर : हदयशस्रक्रिया विश्वातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डाँ.श्रीकांत कोले व डाँ.अक्षय बाफना यांचेसह कुशल टीम ने भीमराव नारायण शिंदे ( वय ६५ ) रा. बुवाचे वाठार,ता . हातकणंगले जि.कोल्हापूर या रूग्णावर येथील अथायु हॉस्पिटलमध्ये हदयाची झडप कोणतीही चिरफाड न करता यशस्वीपणे करुन कोल्हापूर च्या वैघकीय क्षेत्रांत एक मानाचा तुरा रोवला आहे. आज पेंशट भीमराव शिंदेसह यांची या आँपरेशन करणारे पथकाने सविस्तर माहिती दिली. शिंदेवर एक बायपास सर्जरी २०११ साली झाली होती. फेब्रुवारी २०२०मध्ये सदर रूग्णास पुन्हा हृदयविकाराचा त्रास सुर झाला. अथायु मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, उजळाईवाडी येथे रूग्ण शिंदे यांच्या आवश्यक त्या सर्व वैद्यकी तपासण्या केल्यानंतर शिंदे यांच्या हृदयाची झडप सुरळीत कार्य करत नसल्याने ती त्वरीत बदलण्याची गरज असल्याचे निष्पन्न झाले.२०११ साली झालेली बायपास सर्जरी व या रूग्णास मधुमेहाचा त्रास असल्याने सदरची हृदयाची झडप बदलण्याची शस्त्रक्रिया करणे तसे जोखमीचे होते, परंतु अथायु हॉस्पिटल येथे अत्याधुनिक तावी ( TAVI ) तंत्रज्ञान उपलब्ध असल्याने रूग्णाची कोणत्याही प्रकारची चिरफाड न करता ( ओपन हार्ट सर्जरी ) पायातील मोठ्या शिरेतून झडप बसवण्याची अत्यंत अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे भीमराव शिंदे यांच्यावर करण्यात आली. ही शस्त्रक्रिया करतांना २१.५ एमएम. ची ३ जनरेशन बलुन एक्स्पान्डेबल व्हॉल्व वापरली. ही शस्त्रक्रिया केवळ ४ तासांत पार पडली. शस्त्रक्रियेनंतर रूग्ण दोन दिवसांत कोणत्याही आधाराविना चालू लागला. हा कोल्हापुरच्या वैघकीय प्रगतीचा मोठा टप्पाच ठरत आहे. सदरची शस्त्रक्रिया डॉ . चोप्रा अॅज अ प्रॉक्टर, मुंबई डॉ . अक्षय बाफना ( कार्डीओलॉजीस्ट ) डॉ.श्रीकांत कोले डॉ.अमोल भोजे ( हार्ट सर्जन ) डॉ.अक्षय खुरपे ( फिजीशियन ) डॉ .टीना गांधी ( भूलतज्ञ ) डॉ.शुभांगी पवार ( भूलतज्ञ ) डॉ .सतिश पुराणिक ( सीईओ अथायु हॉस्पिटल ) या टीमने ही शस्त्रक्रिया अथायु हॉस्पिटल येथे यशस्वी पार पाडली.देशातील महानगरातील दर्जौची वैघकीय ऊपचार पध्दती कोल्हापूर मध्ये ही कुशल मनुष्यबळासह ऊपलब्ध असल्याचे कृतीशीलपणे दाखवून दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!