
कोल्हापूर: येथील केआयटी इंजिनिअरींग व आयएमईआर कॉलेजचा पदवीदान समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते ग्लोबएज सॉफ्टवेअर लिमिटेड, बेंगलोरचे उपाध्यक्ष व एच आर विभागाचे प्रमुख श्री. नागनगौडा एस. जे. तसेच सन्मानीय उपस्थिती होती शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. पी. डी. राऊत यांची. आपल्या मुख्य भाषणात मुख्य अतिथी श्री. नागनगौडा एस. जे. यांनी कोल्हापूरच्या उर्जावान भुमीला नतमस्तक केले व देशासाठी केआयटीचे अभियंते व आयएमईआरचे पदवीधर नक्कीच सकारात्मक योगदान देतील असा विश्वास व्यक्त केला. जगामध्ये पाचवी सर्वात मोठी आर्थीक सत्ता आपल्या देशाची आहे हे सांगताना जगातील प्रथम क्रमांकाची बौध्दीक सत्ता ही आपल्या देशाची असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सन्मानीय अतिथी डॉ. पी. डी. राऊत यांनी पर्यावरण व विकास याबाबत समतोल राखण्याचे आव्हान तरुण अभियंत्यानी स्विकारावे व शाश्वत विकासासाठी सर्व पदवी व पदव्युत्तर विद्याथ्र्यांनी योगदान देतील अशी अपेक्षा व्यक्त केली. महाविद्यालयाचे विश्वस्त श्री. सचिन मेनन यांनी विद्याथ्र्यांना व्यावसायिकतेची कास धरण्याबाबत प्रोत्साहित केले. कार्यक्रमात पदव्युत्त्तर व पदवी अधिविभागातील अग्रणी विद्याथ्र्यांना पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत आयएमईआरचे संचालक डॉ. एस. एम. खाडीलकर यांनी केले. मुख्य अतिथी श्री. नागनगौडा एस. जे. यांचे स्वागत विश्वत श्री. सचिन मेनन व सन्माननीय अतिथी डॉ. पी. डी. राऊत यांचे स्वागत संस्थेचे सचिव श्री. दिपक चौगुले यांनी केले. या दिमाखदार सोहळयाचे आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सई ठाकुर यांनी केले. सोहळयास अधिष्ठाता, परीक्षा व मुल्यमापन विभाग डॉ. वाय. एम. पाटील, अन्य सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक, शिक्षकेत्त्तर कर्मचारी उपस्थित होते. पदवीदान सोहळयाची सुरुवात स्नातकांच्या मिरवणुकीने झाली.
Leave a Reply