
कोल्हापूर : मधुमेह नियंत्रण व उपचार या विषयाचे नवे ज्ञान मधुमेहाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूटच्या वतीने ६ ते ८ मार्च २०२० या कालावधीत पुणे येथे चौथ्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२० चे आयोजन केले आहे. मधुमेह उपचारावर सकारात्मक प्रभाव पडावा तसेच अद्ययावत संशोधन व ज्ञानासह आरोग्यसेवा देणाऱ्यांना सक्षम बनविणे या उदेशाने मधुमेह परिषदेचे आयोजन केले असल्याचे चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री लाल.एल.चेलाराम यांनी सांगितले.
मधुमेहामुळे अन्य विकार होण्याची शक्यता असते, त्याचे व्यवस्थापन करता येते. याबाबत जगभरातून आलेली तज्ञ मंडळी आपले अनुभव व ज्ञान सदर करणार आहेत. रक्तातील साखरेचे नियंत्रण, मधुमेह व्यक्तींची काळजी, ग्लूकोजचे प्रमाण, डायबेटीस केअर मध्ये काही नवीन संशोधन, डायबेटीस हार्ट फेल्युअर, इंसुलिन पंप, बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया, आठवड्यातून एकदा इंजेक्शन्स, डायबेटीस व्यवस्थापना मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेन्सची भूमिका, मधुमेहाचे रिमोट मॉनिटरिंग, मधुमेह रुग्णांची काळजी घेणे या गोष्टींवर चर्चा केली जाणार आहे. या प्रसंगी ४० तरुण संशोधक आपले संशोधन सादर करणार आहेत.
या परिषदेचे उद्घाटन मेजर जनरल डॉ. माधुरी कानिटकर, एव्हीएसएम, व्हीएसएम, एमबीबीएस, एमडी (पेडियाट्रिक्स), डीएनबी (बाल रोग), मेजर जनरल मेडिकल उधमपूर, फेलोशिप पेडियाट्रिक नेफरोलॉजी, एफआयएपी, फेलो फेमर, माजी डीन आणि डेप्युटी कमॅंडेंट आर्म्ड फोर्सस मेडिकल कॉलेज पुणे आणि डॉ. भूषण पटवर्धन, पीएचडी, एफएनएएससी, एफएएमएस, उपाध्यक्ष यूनिवर्सिटी ग्रॅंट्स कमिशन नवी दिल्ली यांच्या हस्ते होणार आहे.
Leave a Reply