
कोल्हापूर/प्रतिनिधी: जालनावाला क्रीडा प्रशिक्षण व संशोधन केंद्र
(जेएसटीआरसी) च्यावतीने महिला व मुलींसाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी स्वसंरक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या स्वसंरक्षण कार्यशाळेत सुमारे २० ते २५ महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासाठी सहभागी झाल्या.आज स्वसंरक्षण ही काळाची गरज बनली आहे.या कार्यशाळेत गृहिणी, नोकरीसाठी बाहेर जाणाऱ्या, घरेलु कामकाज करणाऱ्या तसेच शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या युवतींचा समावेश होता.
आज समाज हा महिलांसाठी सुरक्षित नाही.महिला-मुली यांना अनेक वाईट प्रसंगाना समोर जावे लागत आहे. यात काही वेळा त्यांना त्यांचा जीव ही गमवावा लागतो.दररोज जीवनामध्ये अचानक आलेल्या संकटाना अगर अतीप्रसंगतून स्वतःचे रक्षण जवळ उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचा उदा. बॉलपेन, गाडीची चावी, हेअर पिन, स्प्रे याचा वापर करून आपले आणि इतरांचे रक्षण करावे याचे शास्त्रशुद्ध पध्दतीने प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात सोप्या आणि सहज पद्धतींवर लक्ष केंद्रित केले गेले. जे वेगवेगळ्या प्रसंगी गुन्हेगारांपासून स्वत:चे संरक्षण करण्यास मदत करू शकतात.महिलांनीही याला उस्फुर्त प्रतिसाद दिला.कार्यशाळेत दिलेल्या प्रशिक्षणातून महिलांना स्वसंरक्षणाबद्दल माहिती मिळाली तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढला.
कार्यशाळेत मास्टर अमोल भोसले, फोर्थ दान ब्लॅक बेल्ट, (तायक्वोंडो आणि हॅपकिडो) यांनी मार्गदर्शन केले. ऋषिकेश इटगी, रोहित खुडे यांचे सहकार्य लाभले. डॉ. व्ही. आर. किशोर कुमार यांनी सूत्र संचालन केले.
Leave a Reply