
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना या विषाणूचे संसर्ग बाधीत रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे या कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील मंगल कार्यालय, लॉन व मॉलची कोरोना व्हायरसमुुुळे आज अग्निशमन विभागाच्यावतीने तपासणी करण्यात आली. याठिकाणी मंगल कार्यालय, लॉन व सांस्कृतीक हॉलच्या व्यवस्थापकास मंगळवार दि.31 मार्च 2020 पर्यंत कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन न करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. यावेळी धैर्यप्रसाद मंगल कार्यालय, महासैनिक दरबार हॉल, राजगौरव मंगल कार्यालय, महालक्ष्मी मंगल कार्यालय, मुस्कान लॉन, रामकृष्ण मंगल कार्यालय, स्टार बझार, डी मार्ट, अक्षता मंगल कार्यालय, रिलायंस मॉल इत्यादी ठिकाणी तपासणी करण्यात आली. सदर मोहीम मुख्य अग्निशमन अधिकारी रणजीत चिले यांचे मार्गदर्शनाखाली उपमुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे व स्थानक अधिकारी मनिष रणभीसे यांनी पार पाडली.
Leave a Reply