
कोल्हापूर : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायातील एक भाग म्हणून व नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी पान, तंबाखू, व तत्सम पदार्थांच्या माध्यमातून थुंकीमधून कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ठिकाणची खाऊची पाने, पानपट्टी, तंबाखूजन्य पदार्थ, मावा, सुगंधी सुपारी व तत्सम खाण्याचे व चघळण्याचे पदार्थ विक्री करण्याऱ्या सर्व दुकानांवर आज (दि २२) पासून ३१ मार्च पर्यंत सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून बंदी घालण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
जर या आदेशाचे पालन न केल्यास भारतीय दंड संहिता १८६० (४५) यांच्या कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेल्या अपराध केला असे मानून कारवाई करण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले आहे.
तरी कोरोना विषाणूंचा सामना करण्यासाठी लोकांनी जागरूक राहून सर्वतोपरी काळजी घ्यावी असे आवाहन हि करण्यात आले आहे.
Leave a Reply