
कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यात जमावबंदी आदेश प्रशासनामार्फत लागू करण्यात येत आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा सुरळीत राहणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले.
मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्यातच 144 कलम लागू केले आहे. 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येवू नयेत. असे सांगून पालकमंत्री म्हणाले, वैद्यकीय सुविधा, दूध भाजीपाला, किराणा, इंधन अशा जीवनावश्यक सेवा सुरळीत राहणार आहेत. याबाबत प्रशासनाकडून सविस्तर आदेश काढले जातील. यामध्ये अत्यावश्यक सेवांचा उल्लेख असेल. आज ज्याप्रमाणे जनतेने प्रतिसाद दिला त्याप्रमाणे इथून पुढेही सहकार्य करावे. अत्यंत गरजेच्यावेळीच घरातून बाहेर पडावे. आपली तसेच इतरांची सुरक्षा घ्यावी, असेही ते म्हणाले.
Leave a Reply