
कोल्हापूर: जगभरात व देशामध्ये कोरोना विषाणू थैमान घातले आहे. दिवसेंदिवस देशात व महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णाची वाढ होत आहे. पश्चिम महाराष्ट्र ही रुग्णांची संख्या वाढली आहे. सांगली व सातारा या आपल्या जवळच्या जिल्ह्यांत कोरोना बाधित रुग्ण सापडले आहे. महाराष्ट्र राज्यात सरकारने संचार बंदी लागु केली आहे. शहरातील व जिल्ह्यातील नागरिक घराबाहेर पडू नये. सर्वानी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. पोलीस यंत्रणा,आरोग्य यंत्रणा व प्रशासन यांनी महत्वपूर्ण भुमिका बजावत आहेत. या यंत्रणेनी दिलेल्या सूचनांचे पालन शहरातील नागरिकांनी करावे.असे लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार चंद्रकांत जाधव यांनी आवाहन केले आहे.आज सकाळपासून आमदार चंद्रकांत जाधव यांनी प्रशासन कडुन कोल्हापूर शहर व जिल्ह्याचा आढावा घेतला आहे. प्रशासनाने आज पर्यंत 1189 जणांनी स्क्रीनिंग करुन घेतले आहे. घरी अलगीकरण करण्यात आलेल्यांपैकी 194 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. ही चांगली गोष्ट आहे. जीवनावश्यक सेवा सुरळीत राहणार आहे.कोरोना विषाणू पासुन येणाऱ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.असे आवाहन आमदार चंद्रकांत जाधव यांनी केले
Leave a Reply