कोल्हापूर येथे महिला रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

 

कोल्हापूर: सीपीआर येथे उपचार घेणाऱ्या 63 वर्षीय महिलेचा कोरोनाबाबतचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला,अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.
कसबा बावडा येथे राहणारी ही महिला 20 व 21 मार्च रोजी सातारा येथे गेली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 22 ते 28 मार्च ती कोरेगाव तालुक्यातील बनवडे येथे गेली होती. 28 मार्च रोजी ती कोल्हापूरमध्ये परत आली होती. तीला सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे 30 मार्चला दिसून आली. दुसऱ्याच दिवशी 31 मार्चला खासगी रुग्णालयात तिने उपचार घेतला. 3 एप्रिल रोजी बावड्यातील सेवा रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सीपीआरमध्ये दाखल करुन तिचा स्वॅब घेण्यात आला. याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला.
यादरम्यान तिच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेवून त्याबाबत पुढील खबरदारीचे उपाय म्हणून कार्यवाही सुरु आहे.

3 responses to “कोल्हापूर येथे महिला रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह”

  1. I have to say, dream86bet has a certain charm. It’s not the fanciest site, but it’s reliable and the odds are pretty good. I’ve made some decent bets here and never had any issues. Give it a shot if you’re looking for a straightforward experience. Look here: dream86bet

Leave a Reply to 79clubonline Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!