
कोल्हापूर ; कोल्हापूर येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाय योजना सुरु आहेत या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्याकडून प्रतिबंध उपाय म्हणून सॅनीटायझर वाटप करण्यात आले. आज राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश उपाध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे हे सॅनीटायझर सुपूर्द करण्यात आले. आ. रोहित पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या मदतीसाठी पावले उचलली आहेत असे प्रतिपादन नविद मुश्रीफ यांनी केले. यावेळी कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई साहेब जिल्हा परिषद मुख्य अधिकारी अमन मित्तल, मा. महेंद्र चव्हाण व अधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply