
कागल ; कागल येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाय योजना सुरु आहेत या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक कर्तव्य बजावणारे आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी अधिकारी व ग्रामीण रुग्णालयातील तसेच तहसीलदार कार्यातील सर्व कर्मचाऱ्यांना मा. हसन मुश्रीफ फौंडेशन , कागल यांच्याकडून प्रतिबंध उपाय म्हणून सॅनीटायझर वाटप करण्यात आले. आज केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने व राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश उपाध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते तहसीलदार सौ शिल्पा ठोकडे , गट विकास अधिकारी शबाना मोकाशी, कागल मुख्याधिकारी पंडित पाटील, पोलिस मोहन म्हांटूंगे व आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्याकडे हे सॅनीटायझर सुपूर्द करण्यात आले.
Leave a Reply