
कोल्हापूर : कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.आम. राजेश क्षीरसागर (कॅबिनेट मंत्री दर्जा) यांच्यातर्फे समाजातील गरजू नागरिकांना मदतीचे वाटप करण्यात आले. तर मुख्यमंत्री नाम.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आवाहनास प्रतिसाद देवून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.आम. राजेश क्षीरसागर (कॅबिनेट मंत्री दर्जा) यांच्यासह कुटुंबीयांनी रक्तदान करून सामाजिक कर्तव्य बजावले. यासह कोरोनोच्या संकटकाळात देवदूताप्रमाणे अहोरात्र काम करणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि शहरातील तीन ठिकाणील गरजू नागरिकांना दुपारच्या भोजनाचे वाटप करण्यात आले.शासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतत पालन करून आज शिवसेना शहर कार्यालय येथे सोशल डीस्टन्स ठेवून शहरातील रिक्षाव्यावसायिक, रोजंदारीवर काम करणाऱ्या गारमेंट पार्क मधील महिलांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.आम. राजेश क्षीरसागर (कॅबिनेट मंत्री दर्जा), देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, युवानेते ऋतुराज क्षीरसागर, युवानेते पुष्कराज क्षीरसागर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यामध्ये तांदूळ दहा किलो, तेल एक किलो, गहू १० किलो, साखर तीन किलो, चहा पावडर १ किलो, तूरडाळ १ किलो आदी कडधान्य आदींचा समावेश होता.यानंतर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी २४ तास अहोरात्र राबणाऱ्या पोलीस कर्मचार्यांना भोजनाचे वाटप करण्यात आले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.आम. राजेश क्षीरसागर (कॅबिनेट मंत्री दर्जा) यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, सचिन राऊत, उदय पोतदार, संतोष रेवणकर, इंदजित सावेकर, सौरभ हारुगले, अमर पाटील, यांनी शहरात ठीकठिकाणी पोलीस कर्मचार्याना दुपारच्या भोजनाचे वाटप केले. तर शहरातील शाहूनगर, डवरी वसाहत, मदारी वसाहत येथील सुमारे १००० नागरिकांना अश्विन शेळके, दादू शिंदे, सलीम मदारी, अंकुश निपाणीकर, यांच्या टीमने जेवणाचे वाटप केले.या परीस्थित आम्ही शहरवासीयांच्या सोबत आहोत. कोरोनो व्हायरसच्या धर्तीवर शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, कोरोनो व्हायरस पासून संरक्षणासाठी योग्य त्या उपाययोजना व काळजी नागरिकांनी घ्यावी, कोरोनोची लक्षणे दिसल्यास तातडीने रुग्णालयाशी संपर्क साधावा, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.आम.राजेश क्षीरसागर (कॅबिनेट मंत्री दर्जा) यांनी केले आहे.
Leave a Reply