
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच खाजगी डॉक्टरांनो, तुम्हाला हात जोडतो.. ओपीडी आणि इतर सेवा सुरू ठेवा! असे भावनिक आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. कोरोना सोडून इतर आजार आणि व्याधींच्या रुग्णांची फरपट होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. याबाबत मंत्री श्री. मुश्रीफ यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे , जिल्हयामधील अनेक खाजगी दवाखाने, मल्टीस्पेशालिटी दवाखाने यांनी कोरोना व्हायरसच्या भितीपोटी ओ.पी.डी. व इतर सेवा बंद केल्या आहेत किंवा परिमेडिकल स्टाफ येत नाहीत, अशी सबब सांगितली जाते हे बरोबर नाही. कोरोना सोडून अनेक आजार, व्याधी आहेत. त्यासाठी जावयाये कोठे? खोकला, सर्दि, पइसे किंवा कोरोना लक्षणे असलेली पेशंट ही सरकारी हॉस्पीटलला पाठवावे, अशी
सुचना शासकिय पातळीवर केली आहे. परंतु, इतर जे आजार आहेत उदा: कॅन्सर , हृदयविकार, मूत्रपिंड,
डायबेटीज, पित्ताशय, हार्णिया, दातांचे रुग्न, हाडांचे विकार , डोळ्यांचे पेशंट असे अनेक आजार, व्याधी आहेत की यासाठी लोकांनी या लॉकडाऊनच्या काळात जावयाचे कोठे? त्यांचे हाल -अपेष्टा पाहून मी अधीक अस्वस्थ होत आहे.लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेच्या विविध स्वरूपाच्या तक्रारी येत आहेत . यामध्ये प्रसूतीसाठी अवघडलेल्या भगिनी आणि लहान बाळांच्या व्यथा तर मन सुन्न करून टाकणाऱ्या आहेत. अशा संकट काळातच डॉक्टरांनो सेवा करून गरजूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची हीच खरी वेळ आहे. माझी हात जोडून विनती आहे की आपणास देवाने ही सेवा करण्याची संधी दिली आहे. ती आपण आजपर्यंत प्रामाणिकपणे
करत आला आहात . तुमचे आजचे वैभव याच लोकांच्या सहकार्याने उभे राहिले आहे. तुमची मुले डॉक्टर झाली. जो आपण व्याप वाढविलेला आहे, त्या वैभवाला रुग्णांच्या सेवेमुळे सुंदरता लाभेल. घेतलेला वसा टाकू नका.
मी गेली सातत्याने १५ वर्षांपासून धर्मादाय दवाखान्यामधून दर आठवड्याला १५ ते २० पेशंट नित्यनेमाने मुंबईला घेऊन जाऊन उपचार व शस्त्रक्रिया करून घेऊन आणत होतो. मुख्यमंत्री सहायता निधीमधून अनेकांना आर्थिक सहायतासाठी मदत करत होतो. कोरोनामुळे लॉकडाऊन पासून वहातूक बंद झाली. दवाखान्याने तारखा दिल्या, ते पेशंट माइयाकडे येतात त्यांच्या व्यथा त्यांचे होणारे हाल पाहिल्यानंतर मी निशब्द होतो . आज माझ्याकडे त्यांचे उत्तर नाही. त्यापैकी अनेक मुंबईमधील हॉस्पीटल कोरोना रोगाचा त्यांच्या स्टाफमध्ये फैलाव झाल्यामुळे शासनाने सिल केले आहेत. फक्त कोल्हापूरमधील मोठ्या खाजगी दवाखान्यामधून उपचार करून घेणे, एवढाच मार्ग आहे. तेवढी सेवा आपण करावी, एवढीच कळकळीची विनंती आहे.
खाजगी दवाखान्याला जर शासकीय पातळीवर अडचणी असतील किंवा शासकीय पातळीवर अडचणी असतील, कोणत्या रोष्टीची आवश्यकता असलेस मी निश्चीत त्यामध्ये सहकार्य करीन. परंतू, आपली सेवा अखंडीत सुरू ठेवावी व समाजाचा दुवा घ्यावा, अशी विनती करतो. महात्मा फुले जिवनदायी योजना व आयुष्यमान योजना, तसेच एस आय कामगार व इतर योजना या मिळवून देणेसाठी मी तुम्हाला सहकार्य करीन, याचा विश्वास देतो. रोष घेऊ नये.
Leave a Reply