
कोल्हापूर : ‘कोरोना’विषाणूने जगभरात मृत्यूचे थैमान घातले आहे. लक्षावधी लोक बाधित झाले आहेत, अजूनही हा संसर्ग थांबण्याचे नाव घेत नाही. परिणामी भारतभरात ‘संचारबंदी आणि दळणवळण बंदी’ (लॉकडाऊन) करण्यात आली आहे. एकूणच समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेआहे. काळजी, चिंता ,निराशा आणि असुरक्षितता या भावना वाढीस लागल्या आहेत. या काळात सर्वांचे मनोधैर्य खचत चालले आहे. हे मानसिक खच्चीकरण थांबवण्यासाठी, आत्मबळ वाढवण्यासाठी आणि अशा प्रकारच्या कठीण प्रसंगांतही आनंदी रहाण्यासाठी नियमित साधनाकरायला हवी. ही काळाची आवश्यकता जाणून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने‘ऑनलाईन सत्संगांची मालिका’चालू करण्यात आली आहे. याचा लाभ अधिकाधिक जनतेने घ्यावा,असे आवाहन सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीयांच्या वतीने करण्यात आले आहे. दळणवळण बंदीच्या कालावधीत लोकांनी घराच्या बाहेर पडू नये, असे शासनाने आवाहन केले आहे. त्यामुळे घरी बसूनही अनेकांना ‘काय करावे’, हे सुचेनासे झाले आहे. मुलांना बाहेर खेळायला पाठवता येत नाही, त्यांना ‘कायद्यावे’ हा पण प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ही ‘ऑनलाइन सत्संग मालिका’ आपल्या कुटुंबासाठी निश्चितच पूरक ठरेल. या मालिकेत लहान मुलांसाठी ‘बालसंस्कारवर्ग’; या भीषण आत्पकाळातआत्मबळ वाढावे, यासाठी ‘नामजप सत्संग’; ईश्वरावरील श्रद्धा दृढ होऊन ईश्वराप्रतीभाव वृद्धींगत करण्यासाठी‘भावसत्संग’; तसेच अचानक येणार्या अशा आपत्तींबद्दल‘धर्म काय सांगतो’, धर्मशिक्षणाचीआवश्यकता आदी अनेक प्रश्नांचीउत्तरे देणारा ‘धर्मसंवाद’असे चार कार्यक्रम प्रतीदिनआरंभ केले आहेत. ही‘ऑनलाईन सत्संग मालिका’ हिंदुजनजागृती समितीच्या ‘हिंदुअधिवेशन’ या ‘फेसबुक पेज’आणि ‘हिंदुजागृती’ या ‘यू-ट्यूबचॅनल’द्वारे, तसेच सनातन संस्थेच्याही ‘फेसबुकपेज’ आणि ‘यू-ट्यूबचॅनल’द्वारे लाइव्ह प्रक्षेपित करण्यात येत आहे. हे सत्संग हिंदी भाषेसमवेत कन्नड, तेलुगु, तमिळ आणि मल्ल्याळम भाषांमध्येही होत आहेत. या कार्यक्रमांचा घरबसल्या लाभ घेऊन ‘लॉकडाऊन’च्या काळाचा सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहनही सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.ऑनलाईनसत्संगांची मालिका’ प्रक्षेपणाच्या वेळा :
1. नामजप सत्संग – सकाळी 10.30 ते 11.15 (पुनर्प्रक्षेपण – दु. 4 ते 4.45)
2. बालसंस्कारवर्ग – सकाळी 11.15 ते 12
3. भावसत्संग – दुपारी 2.30 ते 3.15
4. धर्मसंवाद – रात्री 8.00 ते 8.45 (पुनर्प्रक्षेपण दुसर्या दिवशी दुपारी 1 ते 1.45)
‘ऑनलाईन सत्संग मालिका’ कुठे पहाल ?
*Youtube.com/HinduJagruti*
*Youtube.com/SanatanSanstha1*
*Facebook.com/HinduAdhiveshan*
*Facebook.com/Sanatan.o
Leave a Reply