
कोल्हापूर:मानसिकता आणि लॉकडाऊननंतर भविष्यातील तयारी काय असावी, या विषयावर बेबीनार मीटिंगच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामध्ये ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे माजी अध्यक्ष नितीन खंडेलवाल आणि मॅनेजमेंट ज्वेलरी कन्सल्टंट शब्बीर वसया यांनी संवाद साधला.यावेळी शब्बीर वसाया म्हणाले,सध्या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून आपले ग्राहक कोण, त्यांच्या आवडीनिवडी ओळखून ठेवा. व्यवसाय वाढीसाठी कमी नफ्यामध्ये काम करू नका आणि व्यवसाय वाढवावयाचा असेल तर अनैतिक प्रकारांना यामध्ये अजिबात स्थान देऊ नका.नितीन खंडेलवाल यांनी व्यवसाय आणि ग्राहकांची सांगड घालताना लॉकडाऊन एक संधी माना, असे सांगितले. अध्यक्ष भरत ओसवाल यांनी अशा प्रकारची कार्यशाळा आयोजित करण्याचा उद्देश स्पष्ट केला. झूम अपच्या माध्यमातून झालेल्या या कार्यशाळेला फक्त राज्यच नव्हे तर राज्याबाहेरून ८२३ सराफ व सुवर्ण कारागीर सहभागी झाले होते.
दरम्यान, नुकतीच झूम अपच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या पदाधिकारी आणि संचालकांची बैठकही झाली. त्यामध्ये शासनाला मदत देण्यासाठी निधी उभारण्यात आला. यावेळी एक लाख रुपये गोळा करण्यात आले. त्यातून शासनाला २०० पीपीई कीटस आज देण्यात आले, तर जीवनावश्यक वस्तूंचे कीटही गरजवंतांना देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे कीट सोपविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, खजानिस जितेंद्र राठोड,संचालक विजयकुमार भोसले,संजय चोडणकर, किशोर शहा, बाबासाहेब खाडे आदी उपस्थित होते.
Leave a Reply