
कोल्हापूर:कोरोना कोव्हीड १९ विषाणूचा सामना करण्यासाठी सिंधी समाजाने शंभर पीपीई किट, तीन हजार मास्क आणि वीस सॅनिटायझर बॉक्स पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सिंधी समाज बांधवांनी सुपूर्द केले. यावेळी सिंधी समाजाने कोरोनापासून बचाव करण्यासाठी दवाखान्यांना ज्या आवश्यक बाबी लागणार आहेत त्याचीही लवकरात लवकर पूर्तता करू अशी ग्वाही दिली.
कोरोना विषाणूचा वाढत प्रभाव रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील हे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी समाजातून अनेकजण मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याचे अनेकांनी ग्वाही दिली. त्यानुसार सिंधी समाजाने कोरोनाच्या सामना करण्यासाठी शंभर पीपीई किट, तीन हजार मास्क आणि वीस सॅनिटायझर बॉक्स पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे समाजाचे अध्यक्ष ब्रिजलाल लालवानी यांनी सुपूर्द केले. यावेळी त्यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी दवाखान्यांना आवश्यक असलेल्या बाबींचीही लवकरात लवकर पूर्तता करू अशी ग्वाही दिली.याप्रसंगी कोल्हापूर सिंधी समाजाचे उद्योगपती गोपी लालवानी, संचालक शशी गजवानी, रमेश तनवानी, जेठानंद मोटवानी, चंदू कालानी, सुरेश चंदवानी, संजयकूमार नागदेव, अनिल हीराणी, राम जेसवानी, सुभाष चंदवानी, गुलाबराव घोरपडे, शिखर बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक आदी उपस्थित होते.
Leave a Reply