
कोल्हापूर:कोणत्याही सार्वजनिक आपत्ती वेळी आणि गोर गरिबांच्या अडचणीवेळी मदतीला धावून जाण्याची महाडिक परिवाराची जणू परंपरा आहे. सध्याच्या कोरोना संकट काळातही, कामगार- मजूर यांना तयार जेवणाची पाकिटं महाडिक कुटुंबीयांनी वाटली. नंतर हातावर पोट असलेल्या कुटुंबांना धान्य- डाळी – तेल यासह जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले. आता जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत, पुन्हा एकदा महाडिक परिवाराने आपली सामाजिक बांधिलकी कृतीतून दाखवून दिलीय. कोरोना विरुद्धची लढाई अधिक व्यापक करताना, खबरदारी म्हणून शिवाजी विद्यापीठ परिसरात, 500 बेडचे रुग्णालय सुरू करण्याचा प्रशासनाचा निर्णय आहे. या नव्या आणि स्वतंत्र कोरोना हॉस्पिटल साठी, दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी महोदयांनी केले होते. त्याला तत्काळ प्रतिसाद देत, महाडिक परिवाराने 100 बेड किंवा 20 स्वयंचलित आयसीयू बेड अथवा 100 बेडसाठी आवश्यक अन्य वैद्यकीय साधन सामुग्री देण्याची तयारी दर्शवली आहे. माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक,अमल महाडिक,पृथ्वीराज महाडिक,नाना कदम यांनी,जिल्हाधिकारी दौलत देसाई,जिल्हा परिषद सी.ओ श्री.अमन मित्तल,महापालिका आयुक्त श्री.कलशेट्टीजी यांच्याशी याबाबत चर्चा केली. महाडिक परिवाराच्या वतीने, हे साहित्य देण्याचे त्यांनी जाहीर केले. दरम्यान कोल्हापूर म्हणजे दातृत्वाची नगरी आहे. त्यामुळे अन्य व्यक्ती, सामाजिक संस्था यांनीही, 500 बेडचे नवे हॉस्पिटल उभे करण्यासाठी, प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन धनंजय महाडिक यांनी केले आहे.
Leave a Reply