कागल एज्युकेशन सोसायटीतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

 

कागल: जगभरात थैमान घातलेल्या कोरोना नियंत्रण मोहिमे अंतर्गत संपूर्ण कागल शहरांतर्गत स्वच्छतेचे कर्तव्य सक्षमपणे बजावणारे कागल नगरपरिषदचे सफाई कर्मचारी, घरोघरी जाऊन सर्वे साठी योगदान देणा-या खाजगी अंगणवाडी सेविका व मदतनीस नगरपालिका शिक्षण मंडळात मानधनावर कार्यरत असणारे शिक्षक यांना सामाजिक बांधिलकी जपत कागल एज्युकेशन सोसायटी तर्फे विविध शाखेतून जमा झालेल्या निधीतून व संस्थेच्या निधीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या जीवनावश्यक वस्तूचा लाभ 161 नागरीकांना देण्यात आला. कागल नगरपालिकेचे 105 सफाई कर्मचारी, नगरपालिका विभागात कार्यरत असणारे 14 अंगणवाडी सेविका तसेच 14 मदतनीस, खाजगी अंगणवाडीतील 4 सेविका व 4 मदतनीस व नगरपालिका शिक्षण मंडळाकडे मानधनावर कार्यरत असणारे 21 शिक्षकांना झाला.
या जीवनावश्यक वस्तूंमध्ये तांदूळ,तेल, डाळ, साखर, बिस्किट, साबण इत्यादी जीवनाश्यक वस्तूचा समावेश‌ होता.
कागल नगरीच्या नगराध्यक्षा सौ. माणिक माळी व माजी नगराध्यक्षा श्रीमती आशाकाकी माने यांच्या हस्ते या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.यावेळी कागल एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सुनील माने,उपनगराध्यक्ष सतीश घाडगे, शिक्षण सभापती सौ. जयश्री शेवडे,नगरसेवक मा. प्रविण काळबर, मा. विवेक लोटे,माजी नगरसेवक सुनिल माळी , अरोग्य अधिकारी मा. नितीन कांबळे, प्राचार्य संकपाळ सर, मख्याधिपीका सौ. सविता माने,सौ. सुजाता माने,सौ. सुवर्णा मगदूम, मा. बाबुराव पुंडे तसेच संस्थेच्या विविध शांखेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!