
फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी
कोल्हापूर:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले 2 महिने अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त अनेक उद्योग धंद्ये ,व्यवसाय बंद होते.मात्र काही दिवसांपासून अनेक उद्योगांना राज्य सरकार आणि
प्रशासनाने परवानगी दिली आहे.त्यामुळे बऱ्यापैकी अनेक व्यवसाय चालू झाले मात्र अजूनही फक्त फेरीवाल्यांचेच व्यवसाय बंदच आहेत.फेरीवाल्यांच्या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाची संख्या खूप मोठी आहे.त्यांचे खूप हाल होत आहेत.कोरोणाने त्यांच्या जीवाला धोका किती होईल हे माहीत नाही मात्र, येत्या काळात आर्थिक घडी पूर्णतः कोलमडल्याने आत्महत्या करायची वेळ येईल.फेरीवाले हे कष्टकरी आहेत. विना काम ते नुसते घरात आणखी किती दिवस बसून काढणार ? काही तरुण तर वाममार्ग सोडून स्वतःचा व्यवसाय करून सामाजिक जबाबदारी उचलत आहेत.अशा वेळी त्यांना पुन्हा वाममार्गाला जाण्यास प्रवृत्त करायचं नसेल तर नक्कीच लवकरात लवकर त्यांना उद्योग व्यवसायास लावले पाहिजे.आज कोल्हापुरात जे काही कोरोना रुग्ण सापडलेत ते बाहेरून आलेले आहेत.मूळचे कोल्हापुरातील कोणीही कोरोनाग्रस्त सापडलेले नाहीत. व्यावसायिक ,उद्योजक यांना व्यवसायास दिलेल्या परवानगी नुसार फेरीवाल्यांनाही सम विषम तारीख प्रमाणे आणि सोशल डीस्टन्सचे नियम पाळून विहित वेळेत व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी.अशी श्री अंबाबाई भक्त समिती च्या वतीने मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्याकडे मेेेल द्वारे निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
श्री अंबाबाई (महालक्ष्मी) भक्त समितीचे महेश उरसाल
अध्यक्ष, भाऊसाहेब गणपुले,राजेंद्र सूर्यवंशी, हर्षल पाटील,अविनाश उरसाल,निखिल माळकर, दिपाली शिंदे ,नम्रता पाटील, सागर सोनार , सुधीर सूर्यवंशी, अनिल कोडोलीकर आदी उपस्थित होते.
Leave a Reply