
कोल्हापूर :आयसोलेशन हॉस्पिटल चव्हाण कॉलनी येथील मयूर राजेंद्र सुतार या मुलाने लॉक डाऊन च्या कालावधीत वॉल पेंटिंग करून बासुरी वाजवीत असलेल्या श्री कृष्णाचे पेंटिंग केले आहे.हे पेंटिंग तयार करण्यास त्याला बरोबर 8 तासाचा कालावधी लागला आहे.जगभर कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आले आहे त्यामुळे गेल्या चाळीस हुन अधिक दिवस लोक घरातच आहेत लॉकडाउनच्या कालावधीचा पुरेपूर उपयोग आपण घरबसल्या कलेच्या माध्यमातून करू शकतो मीही या लॉक डाऊनच्या या कालावधीत हे चित्र बनविले असल्याचे मयूर सुतार याने सांगितले आहे.
लॉकडाऊनच्या काळात अनेकांना आपला वेळेचा उपयोग कसा करायचा असा प्रश्न पड़ला होता.तर तुम्ही घर बसल्या सोप्या पद्धतीने स्वताची कला अवगत करु शकता वॉल पेन्टिंग च्या माध्यमातून खुपच साध्या पद्धतीने सोप्या पद्धतीने तुमची आवडती डिज़ाइनिंग तुम्ही किचन मध्ये किंवा हॉल मध्ये वॉटर कलर किंवा ऑइल पेंट मध्ये करु शकता .आणि मी ही हे वॉटर कलर मध्ये चित्र रेखाटले आहे असे त्याने सांगितले आहे.
Leave a Reply