
कोल्हापूरःकोल्हापूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज, गुरुवारी कोरोनाचे पुन्हा चार पॉझिटीव्ह रूग्ण आढळले. यात एक २० वर्षीय तरुण आणि ३३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. ही महिला ८ महिन्याची गर्भवती असून ती शित्तूरतर्फ (ता. शाहुवाडी) येथील आहे. या महिलेवर सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत. तर २० वर्षीय तरुणावर इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
राधानगरी तालुक्यातील दोघे पॉझिटिव्ह
मुंबई येथून कॅन्सर चे उपचार घेवून आलेल्या दोघांना Corona ची लागण झाल्याचे स्पष्ट. दोघे राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हारावडे आहेत.
मुंबईहून आलेल्या आणि गवसे (ता. चंदगड) येथील रहिवासी असलेल्या तिघांचे अहवाल काल, बुधवारी पॉझिटिव्ह आले होते. यात ३० वर्षीय महिलेसह तिच्या ११ आणि ६ वर्षांच्या मुलांचा समावेश आहे. या तिघांनाही तातडीने सीपीआरमधील कोरोना कक्षात हलवण्यात आले. आज पुन्हा दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. तीन दिवसांत 11 रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासन हादरले आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या 28 वर गेली आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असतानाच जिल्ह्याबाहेरून येणार्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे जिल्ह्याचा धोका वाढत असतानाच जिल्ह्यात आणखी दोन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत.
जिल्ह्यात २६ मार्चला पहिला रुग्ण आढळला होता. यानंतर २६ एप्रिलपर्यंत महिन्याभरात जिल्ह्याची रुग्णसंख्या ११ वर तर एप्रिलअखेर ती १४ वर गेली होती. एक मे ते दि. १३ मे या कालावधीत १० रुग्ण आढळले आहेत. यापैकी नऊ रुग्ण तर अवघ्या पाच दिवसांत आढळले आहेत. यामुळे जिल्ह्यात रुग्णवाढीचा वेग वाढला आहे.
Leave a Reply