स्वत:चे अपयश लपवण्यासाठी चंद्रकांतदादांचा आधार घेऊ नका:भाजप

 

कोल्हापूर :  विविध संमारंभामध्ये विविध पातळीवर केवळ आणि केवळ चंद्रकांतदादांच्यावर टीका केल्याशिवाय ज्यांचे राजकरण पुढे जात नाही अशा मुश्रीफ साहेबांनी अवघा महाराष्ट्र कोणत्या समस्यांनी ग्रस्त आहे याचा काळ आणि वेळ ओळखून राजकीय टीका टिपण्णी बंद करावी.  आपण महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री पदावर असताना या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करणे गरजेचे असताना या महामारीच्या काळात सर्वसमावेषक विचार आणि कृती आवश्यक असताना आपले अपयश झाकण्यासाठी राजकरणाच्या खालच्या पातळीवर जाऊ नये.  भारतीय जनता पार्टीमध्ये स्वत:च्या कर्तुत्वावर पद देण्याची पद्धत आहे. परंतु ज्या राजकीय पक्षामध्ये मुश्रीफ साहेब काम करतात त्याची कार्य पद्धती एक घराण्यापुरती मर्यादित असून संकुचीत विचारसारणीची आहे. मा.चंद्रकांतदादा भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे सातत्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विचार करणे गरजेचे असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सतत प्रवास करत असतात.  याउलट आपण नगर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्या जिल्ह्यास किती न्याय दिला व पालकमंत्री म्हणून काम करत असताना कोण कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात याचे योग्य ते मार्गदर्शन मा.चंद्रकांतदादा यांच्याकडून घ्यावे असे सूचित करावेसे वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!