कोव्हिड 19  ग्राहकांची सुरक्षा हे प्रमुख उद्दिष्ट्य:वेंकटराम मामील्लापाले

 

 

कोव्हिड 19  ग्राहकांची सुरक्षा हे प्रमुख उद्दिष्ट्य- वेंकटराम मामील्लापाले

कोल्हापूर/ प्रतिनिधी : कोव्हिड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व उद्योगधंदे कारखाने शोरूम बंद ठेवण्यात आले होते दरम्यान लॉक डाऊन हळूहळू उठत आहे. त्यामुळे रेनोचे देशांतर्गत व्यापारी कामकाज हळूहळू सुरू होऊ लागले आहे.भारतात टप्प्याटप्प्याने व्यापारी कामकाज सुरू केले माहिती अशी रेनो इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर वेंकटराम मामील्लापाले यांनी दिलीय. दरम्यान कोव्हिड 19 मुळे असणार लॉक डाऊन उठल्यामूळ ग्राहकांची सुरक्षा आणि समाधान हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर ती असल्याने भारतातील अनेक उद्योग व्यवसाय मोठे शोरूम अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले होते मात्र रेनो हा भारताचा पहिल्या क्रमांकाचा युरोपियन ब्रँड असून त्यांनी आपली कार्यालये, निवडक डिलरशीप आणि सेवा केंद्रे सुरू केली आहेत. आपल्या टचपॉइंट्सवर ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी त्यांनी काही सुरक्षात्मक तसेच आरोग्यवर्धक उपाययोजना राबविण्याची तयारी केली. रेनोच्या वतीने 194 हून अधिक शोरूम आणि वर्कशॉप नवीन सुरक्षित प्रोटोकॉलसह सुरू करण्यात येत असून उर्वरीत टचपॉइंट्स टप्प्या-टप्प्याने स्थानिक प्राधिकरणांकडून मिळालेल्या परवानगीच्या आधारे सुरू करण्यात येणार आहेत. रेनोच्या डिलरशीपनी त्यांची सुविधाकेंद्रे आणि टेस्ट ड्राईव्ह करण्यात येणाऱ्या गाड्या योग्यरितीने निर्जंतुक करून विशेष काळजीची खातरजमा करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!