
कोल्हापूरःमाजी खासदार निलेश राणे विरुद्ध आमदार रोहीत पवार पवार असा ट्विटरवॉर ट्विटरवर रंगलेला पाहायला मिळत आहे .एकेरी शब्दाचा वापर करत माजी खासदार निलेश राणे यांनी हा वाद मोठा केल्याचे दिसत आहे. साखर कारखान्यांच्या मुद्द्यावरून निलेश राणे यांनी शरद पवारांना डिवचले, त्यावर आमदार रोहित पवार यांनी त्यांना स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. त्यावर राणे रोहित पवारांवर भडकले.साखर उद्योगाला मदत करण्याबाबत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. त्या अनुषंगाने निलेश राणे यांनी एक ट्विट केले. साखरेवर महाराष्ट्रात किती पैसे खर्च झाले याचे ऑडीट व्हायला पाहिजे अशी मागणी करत निलेश राणे ट्विट केले. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँका, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षानुवर्षे साथ देत आले आहेत. तरीही कारखान्यांना वाचवा? अशा शब्दांत राणे यांनी शरद पवार यांना ट्विटरवर डिवचले.त्याला रोहित पवार यांनी उत्तर देताना पवार साहेबांनी साखर उद्योगासह कुक्कुटपालन व इतर उद्योगातील दुरावस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचविल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडतात. त्यामुळे मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी, असे रोहित पवार यांनी म्हटले. परंतु, रोहित पवार यांनी केलेला कुक्कुटपालनचा उल्लेख निलेश राणे यांना खटकला असावा. यानंतर राणेंनी थेट एकेरी शब्दाचा उल्लेख करत मतदार संघावर लक्ष दे. सगळीकडे नाक टाकू नकोस. नाहीतर साखर कारखान्यासारखी हालत होईल असे राणे यांनी रोहित पवारांना सल्ला दिला. राणे एवढ्यावरच थांबले नाहीत. हे शेंबडे लुडबुड करत असतात. साखरेवर बोललो की, का अस्वस्थ होतात कुणास ठाऊक? या वांग्याला सांगा, ठाकरे मुंबईत राहून नाय काय करू शकले. हा तर अजून स्वतःची धुवायला शिकतोय अशा गलिच्छ शब्दांचाही प्रयोगही निलेश राणे यांनी केला.
ट्विटरवरील या वाकयुद्धानंतर पवार समर्थकांनी राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. रोहित पवार हे आमदार आहेत. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही. ते कुक्कुटपालनावर बोलले. कोंबडी चोरी प्रकरणावर नाही. अशानेच तुम्हाला लोकांनी दोन वेळा घरी बसवले. अशा शब्दांत पवार समर्थकांनी राणे यांच्यावर टीका केली.
Leave a Reply