
कोल्हापूर,: शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामध्ये पाच लाखांचा निधी देण्यात आला. संघाचे अध्यक्ष जी. डी. पाटील, माजी अध्यक्ष युवराज पाटील, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील- भुयेकर यांनी संचालकांसह ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे हा निधी सुपूर्द केला. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रांगणात निधीचा हा धनादेश देण्यात आला.यावेळी आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, शेतकरी संघाच्या संचालक मंडळातील उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील -भूयेकर, संचालक शशिकांत पाटील- चुयेकर, व्यंकाप्पा भोसले, विनोद पाटील, विजयकुमार चौगुले, माजी संचालक एम.एम.पाटील, व्यवस्थापक आप्पासाहेब निर्मळ आदी उपस्थित होते
Leave a Reply