
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाकडून लोकडाऊन ३१ मे पर्यन्त पुन्हा वाढविण्याचा अध्यादेश नव्याने जारी केलेला आहे. लोकडाऊन ज्याअर्थी वाढविला आहे याचाच अर्थ कोरोना या व्हायरलं संसर्गजन्य विषाणूंचे थैमान अजूनही कमी झालेले नाही किंबहुना या विषाणूंचा फैलावं मोठया प्रमाणात वाढत असल्याचे चित्रं संपूर्ण देशभर सुरूच आहे. या कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी करत असलेल्या काम अभिनंदनास्पद आहे. संपूर्ण देशभर या कोरोना विषाणूंचे रुग्ण वाढत आहेत. त्यातून या संसर्गजन्य आजाराची व्याप्ती वाढल्याने रुग्ण संख्येचा परीघही वाढत आहे. दुर्दैवाने आपले महाराष्ट्र राज्य हे सर्वाधिक रुग्णसंख्येने अग्रभागी असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. यामध्येही मुबंई, पुणे, ठाणे याठिकाणी अधिक प्रमाणात रुग्णसंख्या असल्याचे दिसून येत असताना, कोल्हापूर जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणेच्या सतर्कतेमुळे या रोगाचा सामुदायिक प्रसार होण्यावर अंकुश ठेवण्यात प्रशासन यशस्वी ठरत असल्याने संपूर्ण यंत्रणेचे अभिनंदन, पण स्थलांतर केलेल्या नागरिकांमधून कोरोना रोगाचा सामुदायिक संसर्ग वाढणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, स्थलांतरीत नागरिकांचे काटेकोर संस्थात्मक विलगीकरण कालावधी पूर्ण करवून घ्यावा, अशा मागणीचे निवेदन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना सादर केले.
Leave a Reply