
कागल:नामदार हसन मुश्रीफ फाउंडफाउंडेशनकड कागल तालुक्यातील सुरुपली येथील जळीतग्रस्त व आजरा तालुक्यातील आरदाळ येथील वादळग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली. फाउंडेशनचे अध्यक्ष व सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते या कुटुंबांना ही मदत दिली.याबाबत अधिक माहिती अशी, सुरुपली येथील ज्ञानदेव कृष्णात पाटील यांच्या घरात दोन दिवसापूर्वी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले होते. धान्यासह कपडे, भांडी असे सर्व साहित्य जळून खाक झाले होते. आरदाळ येथील येथील श्रीमती सुमन बाजीराव जोशी यांच्या घरावरील छत वादळी पावसात ऊडून गेले होते. तसेच घराचीही प्रचंड पडझड होऊन हे कुटुंब उघड्यावर पडले होते.यावेळी बोलताना नवीद मुश्रीफ म्हणाले, सध्या महाराष्ट्रासह देशभर कोरोनाने थैमान घातले आहे. सबंध मानव जातीवरील हे एक महाभयानक संकट आहे. अशा परिस्थितीत महापूर असो, कोणतेही रोगाची साथ असो की वादळ -वाऱ्याने उध्वस्त झालेले संसार असो. उद्या ते वर आलेले संकट हे आपल्याच कुटुंबावर आलेले संकट असे मानून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ सदैव जनतेच्या संकटात धावून गेले आहेत.यावेळी सुरुपलीचे माजी सरपंच आर.व्ही. पाटील , कॉम्रेड शिवाजीराव गूरव, सुधीर सावंत, विशाल गुरव अरुण मुजावर आदी उपस्थित होते.
Leave a Reply