
कोल्हापूर:दरवर्षी रायगडावर साजरा होणारा शिवराज्याभिषेक हा संपूर्ण महाराष्ट्रात लोकोत्सव बनला आहे. कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली कित्येक वर्षे छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक स्वराज्याच्या राजधानीवर म्हणजे रायगडावर संपन्न होतो. या उपक्रमासाठी देशभरातून अनेक शिवप्रेमी उपस्थित असतात. मात्र यंदा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा अत्यंत मर्यादित मावळ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.इतिहासात असा उल्लेख आहे कि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी भारतातील पवित्र ठिकाणाहून जल आणल होत.नेमक हेच ध्यानात घेऊन याच सोहळ्यासाठी गेल्या अनेक वर्षीपासून कोल्हापूर हायकर्स या ट्रेकिंगसाठी प्रसिध्द असणाऱ्या ग्रुप तर्फे हिमालयातील पवित्र ठिकाणाहून आणि महारष्ट्रातील गड किल्ल्यांवरून राज्याभिषेकासाठी पवित्र जल आणण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यावर्षी अलंग, मदन, कुलंग येथील पवित्र जल या सोहळ्यासाठी आणले आहे.रायगडावर मूख्य कार्यक्रमादिवाशी म्हणजेच ६ जून ला, ३४७ व्या शिवराज्याभिषेकामध्ये शिवमूर्तीवर छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते कोल्हापूर हायकर्सच्या ग्रुपने आणलेल्या पवित्र जलाने अभिषेक करण्यात येणार आहे.मात्र यंदाच्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सदर पवित्र जल हे छत्रपती संभाजीराजे यांच्याकडेच सुपूर्द केले आहे, अशी माहिती कोल्हापूर हायकर्सचे संस्थापक सागर पाटील यांनी दिली.
Leave a Reply