
कोल्हापूर:मागील अडीच महिन्यापासून राज्यातील उद्योग,व्यापार व बाजारपेठा पूर्णपणे बंद झाले आहेत, यामुळे व्यापारी, कामगार,शेतकरी, शेतमजूर, फुटपाथवर बसून आपले पोट भरणारे सर्व नागरिक आर्थिकदृष्ट्या फारच संकटात आले आहेत. काही प्रमाणात यामधील कामगार आणि शेतमजूर यांना राशन च्या माध्यमातून धान्याची मदत शासनाकडून झालेले आहे. परंतु गहू तांदूळ डाळ मिळाली म्हणजे घर चालते असे नाही, या सोबत किराणा,भाजीपाला, दुध, दवाखाना, शाळा किंवा इतर खर्च अनिवार्य आहे.राज्यातील छोटे-मोठे सर्वच रोजगाराचे साधन बंद पडल्यामुळे राज्यातील नागरिकांच्या घरात किंवा हातात एक रुपया सुद्धा बाकी नाही. अशा परिस्थितीत विद्युत बिल, पाण्याचे बिल किंवा इतर बिले नागरिकांना आज न उद्या भरावेच लागणार आहेत. परंतु आणिखी काही महिने या आर्थिक अडचणीतून सामान्य नागरिकांना सावरणे फारच कठीण आहे. यासाठी थोडी का होईना मदत म्हणून राज्यातील ज्या नागरिकांच्या विजेची खपत महिल्याला २०० पेक्षा कमी युनिट आहे, त्या सर्व (ग्राहक) नागरिकांचे विजेचे बिल माफ करावे,अशी मागणी आम आदमी पार्टी केली. दिल्लीतील श्री अरविंद केजरीवाल सरकार गेल्या दोन वर्षांपासून २०० युनिट पर्यंत वीज मोफत देता आहे. याच धर्तीवर चार महिन्याचे विजेचे बिल तातडीने माफ करण्याची घोषणा करावी अन्यथ राज्यातील जनतेला घेवून नाईलाजास्तव रस्तावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.यावेळी अध्यक्ष संदीप देसाई,
जिल्हाध्यक्ष निलेश रेडकर,युवाध्यक्ष उत्तम पाटील,जयवंत पोवार,संतोष घाटगे,सूरज सुर्वे,राज कोरगावकर,अभिजित भोसले,इलाही शेख आदी उपस्थित होते.
Leave a Reply