
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि राज्याभिषेक करून हिंदूंच्या गुलामगिरीच्या मानसिकतेला छेद दिला व समाजात अस्मितेची द्वाही फिरविली, यातून महाराजांनी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील सर्व भूमिपुत्रांना, या देशात आता भूमिपुत्रांचे राज्य निर्माण झाले आहे, असे आश्वस्त केले. शिवराज्याभिषेक सोहळा हा तमाम शिवभक्तांसाठी पर्वणीच असते. परंतु, दरवर्षी होणारा शिवराज्याभिषेक सोहळा कोरोना काळात कोल्हापूर शहर शिवसेनेच्यावतीने अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. शिवाजी महाराज चौक शिवभक्तांचा उत्साह व भारावलेल्या वातावरणात शिवराज्याभिषेक साधेपणाने आज साजरा करण्यात आला. राज्यनियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील पूजेच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक आणि जलाभिषेक करण्यात आला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित शिवभक्तांनी गारद म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना नमन केले. यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”, “जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे” अशा घोषणांनी परिसर दणाणूण सोडला. यानंतर उपस्थितांना साखर पेढे वाटप करून शिवराज्याभिषेक सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक राजू हुंबे, जेष्ठ शिवसैनिक रविभाऊ चौगुले, दीपक गौड, किशोर घाटगे, शिवसेना उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, तुकाराम साळोखे, रणजीत जाधव, रमेश खाडे, सुनील खोत, दीपक चव्हाण, महिला आघाडी शहर संघटक सौ.मंगल साळोखे, विभागप्रमुख सुनील भोसले, कपिल सरनाईक, अश्विन शेळके, युवासेनेचे योगेश चौगुले, पियुष चव्हाण, दिनेश साळोखे, दादू शिंदे, सौरभ कुलकर्णी, मेघराज लुगारे, श्री शहाजी तरूण मंडळाचे कपिल केसरकर, शाहीर आझाद नायकवडी, पितांबरे गुरुजी, राहुल चव्हाण, संतोष रेवणकर, राजू ढाले, सचिन भोळे, सचिन भोसले, आसिफ मुल्लाणी, कृपालसिंह रजपूत, सुभाष पाटील, आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
Leave a Reply