आ. ऋतुराज पाटील यांच्याकडून कोल्हापूर दक्षिणमध्ये होमिओपॅथी औषध आणि सॅनिटायझर वाटप

 

कोल्हापूर:आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून कोल्हापूर दक्षिण मतदार संघ आणि कसबा बावड्यातील कुटुंबांना एक लाख आर्सेनिक एल्बम होमिओपॅथिक औषध तसेच सलून, दळप-कांडप गिरण, छोटे व्यावसायिक याबरोबरच ग्रामपंचायत, दुध डेअरी आणि सेवा सोसायटी आदी संस्था अशा दहा हजार सॅनिटायझर स्प्रे बॉटल्स वाटप उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आणि सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील,महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील ,शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, यांच्या उपस्थितीत झाला.
गेली दोन महिने सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आमदार ऋतुराज पाटील यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता . आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी कोल्हापूर दक्षिण मतदार संघाससह कसबा बावड्यातील प्रत्येक कुटुंबांना रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या एक लाख होमिओपॅथिक औषध बाटल्या वाटप तसेच सार्वजनिक ठिकाणी दहा हजार सॅनिटायझर स्प्रे बॉटल्स देण्याचाही निर्णय घेतला आहे.
आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या अडीच महिन्यांच्या काळात डी. वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून आम्ही गरजूंना वेगवेगळ्या मार्गाने मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या पध्दतीने प्रयत्न करीत आहे. यामध्ये स्वत:ची रोगप्रतिकार शक्ती वाढविणे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ही गोष्ट लक्षात घेवूनच कोल्हापूर दक्षिण मतदार संघ आणि कसबा बावडा इथं रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या ‘आर्सेनिक एल्बम-30 C’ या भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाने मान्यता दिलेल्या होमिओपॅथिक औषधाचे टप्याटप्याने वाटप करण्यात येणार आहे.तसेच कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी योग्य प्रकारे सॅनिटायझेशन करणेही तितकेच महत्वाचे आहे. सार्वजनिक ठिकाणी अनेक लोक एकमेकाच्या संपर्कात येत असतात. त्यावेळी जास्त काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. ही गोष्ट लक्षात घेवूनच दक्षिण मतदारसंघ तसेच कसबा बावडा येथील सार्वजनिक ठिकाणी अर्धा लिटर क्षमतेच्या दहा हजार कायमस्वरूपी वापरता येतील अशा सॅनिटायझर स्प्रे बॉटल देण्यात येणार आहेत.यावेळी करवीर पं. स. उपसभापती सुनील पोवार, गटनेते शारंगधर देशमुख, महिला बालकल्याण समिती सभापती शोभा कवाळे, नगरसेवक मोहन सालपे, सुभाष बुचडे, माजी नगरसेवक राजू लाटकर, सचिन चव्हाण, सुनील मोदी,गोकुळचे माजी संचालक बाबासो चौगले,खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे,जि. प.माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष पार्थ मुंडे आदी उपस्थित होत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!