चिकोत्रा व नागणवाडी धरणाच्या कामाची समरजीतसिंह घाटगे यांच्याकडून पाहणी

 

कोल्हापूर:शेतकर्‍यांना मुबलक पाणीसाठा उपलब्ध व्हावा व तसेच मागील वर्षी उद्भवलेली पुरस्थिती टाळता यावी यासाठी आज #चिकोत्रा व नागणवाडी धरणाच्या कामाची पहाणी केली. #कापशी (सेनापती) परिसरासाठी वरदान ठरणाऱ्या चिकोत्रा धरणातील पाणी साठ्याचे भविष्यातील नियोजन व मागील कित्येक वर्षांपासून रखडलेल्या #नागणवाडी (दिंडेवाडी-बारवे) प्रकल्पाच्या कामाचा आढावा आदी विषयांवर शासकीय अधिकार्‍यांसोबत चर्चा केली. चिकोत्रा धरण मागील वर्षी १०० टक्के भरले होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वर्षीही मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे. यामुळे हे धरण लवकरच भरेल असा अंदाज आहे. या धरणातील पाण्याचे आत्ताच योग्य नियोजन झाले तर पुढील अनेक संकटे टाळता येतील. फडणवीस सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व माजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठिंब्याने मी मागे मंजूर करून घेतलेल्या माद्याळ, बेलेवाडी मासा, साठवण तलावाची व बाळेघोल, तमनाकवडा येथील तलावांच्या सद्य परिस्थितीची माहितीदेखील आज घेतली आहे. मागच्यावर्षी राजे फाउंडेशनच्या माध्यमातून आरळगुंडी पठारावरील पाणी चिकोत्रा धरणामध्ये वळवल्यामुळे हे धरण शंभर टक्के भरण्यास मदत झाली होती. उर्वरित दोन चरी पावसाळ्यानंतर खोदण्याचे नियोजन आता सुरू आहे.
शेतीसाठी पाण्याची सोय व्हावी व नागरिकांना सर्वतोपरी मदत करता यावी हा माझा प्रयत्न आहे. राजर्षी शाहू महाराज व थोरले राजे, डॅडी स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांचे जनहितार्थ कार्य हे माझ्यासाठी दिशादर्शकाचे काम करत आहेत. भविष्याचा अचूक वेध व दूरदृष्टी ही त्यांच्या कार्यातून झळकत राहते. धोरणी व समाजहितदक्षपणा हे गुण माझ्या अंगी रुजावे व अखंड समाजसेवा करता यावी यासाठी मी प्रयत्नशील आहे.
A

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!