
कोल्हापूर :आपला प्रत्येक वाढदिवस सामाजिक ऋण फेडण्यासाठीच व्हावा, असा हेतू ठेवणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस यंदाच्या वर्षी आरोग्यम म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आमदार श्री. चंद्रकांतदादा पाटील कोणाला प्रत्यक्ष भेटणार नाहीत, परंतू आरोग्यम उपक्रमाच्या माध्यमातून शुभेच्छा स्विकारणार आहेत.आरोग्यम उपक्रम म्हणजे ताप मोजण्यासाठी लागणारे १२० रुपयांचे थर्मामीटर आपण गरजू, दु्र्लक्षित घटकांना देण्यात येणार आहे. तसेच अनेकांना थर्मल मशीन, मोठया सोसायटी व अपार्टमेंट ठिकणी सॅनिटायझर स्टँड ही देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर शहरातील सर्व ८१ प्रभागात त्या दिवशी विविध सामाजिक उपक्रम जसे वृक्ष लागवड, लोकांना आर्सेनिक अल्बम ३० च्या होमिओपॅथी औषध वाटप, रक्तदान शिबीर, आयुष्यमान योजना कार्ड वितरण, गरजू मुला-मुलींना वह्या वाटप, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अशा विविध उपक्रमांनी करण्यात येणार आहे. नेहमीच श्री.चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजारा होतो त्यामध्ये लोकसभाग महत्वाचा असतो याहीवर्षी ज्या लोकांना थर्मामीटर, थर्मल मशीन, सोसायटी व अपार्टमेंट ठिकणी सॅनिटायझर स्टँड अशा गोष्टी पुरवायच्या आहेत त्यासाठी ज्यांना सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी संवेदना सोशल फौंडेशन या नावाने चेक संवेदना सोशल फौंडेशनकडे जमा करावेत, असे आवाहन संवेदना सोशल फौंडेशनचे अध्यक्ष राहूल चिकोडे यांनी केले आहे.
Leave a Reply